मुंबई: आजपर्यंत मला कधी माझी जात विचारण्यात आली नाही, मला कधी जात सांगायची वेळही आली नाही, पण आज सगळं चित्र पाहिलं की जातीय विषमता समजते अशा शब्दात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी जातियवादावर बोट ठेवलं.
विले पार्लेतल्या विद्यानिधी इन्फोटेक अॅकॅडमीचं नामकरण सोहळा काल पार पडला. त्यावेळी नाना बोलत होते. यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे हेही मंचावर उपस्थित होते.
नाना म्हणाले, "शाळेत शिकत होतो तेव्हापासून मला आजपर्यंत कोणीही जात विचारली नाही. पण आजची परिस्थिती पाहून वैष्यम्य वाटतं. कलावंत हीच माझी जात आहे. मला प्रेक्षकांनी कलावंत म्हणूनच स्वीकारलं, माझी जात कोणी विचारली नाही. मला ती सांगायची गरजही वाटली नाही"
विद्यानिधी इन्फोटेक अॅकॅडमीच्या नव्या नामकरणाचा कार्यक्रम पार पडला. आतापर्यंत विद्यानिधी इन्फोटेक अॅकॅडमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संस्थेचे श्रीराम मंत्री विद्यानिधी इन्फोटेक अॅकॅडमी असे नवे नामकरण करण्यात आले. यावेळी, विद्यानिधी शिक्षण संकुलाचे प्रणेता श्रीराम मंत्री यांच्या मूर्तीचे अनावरणही करण्यात आले.
आजपर्यंत मला कोणी जात विचारली नाही, माझी जात....: नाना पाटेकर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
31 Jul 2018 08:11 AM (IST)
मला कधी जात सांगायची वेळही आली नाही, पण आज सगळं चित्र पाहिलं की जातीय विषमता समजते अशा शब्दात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी जातियवादावर बोट ठेवलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -