...आम्ही आणि मलिष्का बहीण भाव, नितेश राणेंचा पाठिंबा
एबीपी माझा वेब टीम | 19 Jul 2017 12:00 PM (IST)
'मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय काय' असं म्हणत मुंबई महापालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढणाऱ्या आरजे मलिष्काच्या पाठिशी आता काँग्रेस आमदार नितेश राणे उभे राहिले आहेत.
मुंबई: 'मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय काय' असं म्हणत मुंबई महापालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढणाऱ्या आरजे मलिष्काच्या पाठिशी आता काँग्रेस आमदार नितेश राणे उभे राहिले आहेत. नितेश राणे यांनी ट्विट करुन मलिष्काला पाठिंबा दिला आहे. "मलिष्का तू एकटी नाही. आम्ही आहोत तुझ्या बरोबर.. वाघोबा करतो म्याव म्याव.. आम्ही आणि मलिष्का बहीण भाव!!", असं ट्विट नितेश राणे यांनी केलं. https://twitter.com/NiteshNRane/status/887554866075377664 मलिष्काचं ट्विट मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी, आरजे मलिष्काच्या घरी धाड टाकून, डेंग्यूच्या अळ्या सापडल्याचा दावा केला. त्यामुळे महापालिकेने मलिष्काला नोटीसही पाठवली आहे. या नोटीसनंतर मलिष्काने ट्विट करुन, आपल्याला पाठिंबा देणाऱ्या मुंबईकरांचं आभार मानलं आहे. 'मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय काय' असं म्हणत मुंबई महापालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढल्यानंतर, आर जे मलिष्काने आणखी एक टोला लगावला आहे. मलिष्काने ट्विट करुन, "मला पाठिंबा दिल्याबद्दल सर्वांचे आभार. तुम्ही खूप चांगले आहात. मुंबई, तू बेस्ट आहेस. मला तुझ्यावर भरोसा आहे", असं म्हटलं आहे. https://twitter.com/mymalishka/status/887505519090569218