व्यंगचित्राच्या माध्यमातून नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. हेच व्यंगचित्र त्यांनी आपलं व्हॉट्सअॅप स्टेट्स म्हणूनही ठेवलं आहे.
मुंबई : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणेंच्या संभाव्य मंत्रिमंडळ प्रवेशामुळे शिवसेना आणि भाजपचे संबंध ताणलेले असताना दुसरीकडे नारायण राणेंचे पुत्र नितेश राणेंनी थेट उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. व्यंगचित्राच्या माध्यमातून नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. हेच व्यंगचित्र त्यांनी आपलं व्हॉट्सअॅप स्टेट्स म्हणूनही ठेवलं आहे. नारायण राणे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीमुळे उद्धव ठाकरेंची झोप उडाली असल्याच्या आशयाचं हे व्यंगचित्र आहे. वाजले की बारा! असं या व्यंगचित्राला नितेश यांनी हे नाव दिलं आहे. हे व्यंगचिंत्र स्वत: नितेश राणेंनी काढलं आहे. व्हॉट्सअप स्टेट्ससोबतच नितेश राणेंनी आपल्या ट्विटर अकाउंटवर देखील हे व्यंगचिंत्र शेअर केलं आहे. दरम्यान, नारायण राणेंचा मंत्रिमंडळात प्रवेश होऊ नये यासाठी शिवसेनेचे गेल्या काही दिवसांपासून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राणेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशावर ठाम असल्याच समजतं आहे. त्यातच आता नितेश राणेंनी या व्यंगचित्राच्या माध्यमातून शिवसेनेला आणखी डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. संबंधित बातम्या :राणेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा आणि नितेश राणेंचा व्हॉट्सअॅप डीपी!