मुंबई : कस्तुरबा रुग्णालयातील वॉर्डमध्ये काम करणारे आठ कर्मचारी सध्या प्रचंड त्रास सहन करत आपल्या कर्तव्यावर येतं आहेत. ही मंडळी शहापूर या तालुक्याच्या ठिकाणापासून पुढे 20 किलोमीटर अंतर परिसरातील विविध खेड्यातील रहिवासी आहेत. यातील बहुतेकांनी कस्तुरबा हॉस्पिटलच्या वॉर्डमध्ये काम करत असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आपल्या कुटुंबीयांना पाहुण्यांकडे राहिला पाठवलं आहे. त्यामुळे ते एकटेच घरी आहेत. आपल्या सातच्या ड्युटीवर पोहचण्यासाठी सध्या ते पहाटे साडेतीन पावणे चारला आपलं घर सोडतात. मात्र, तिथून पुढे त्यांचा काही सोप नाही. त्यांचे दिवसभरात जवळपास 9 तास हे केवळ प्रवासात जात असल्याचे भयानक वास्तव समोर आलंय.
कोरोना संकटामुळे संपूर्ण देश ठप्प आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारीच बाहेर पडत आहे. कस्तुरबा रुग्णालयातील वॉर्डमध्ये काम करणारे आठ कर्मचारीही त्यापैकीच एक आहेत. या आठजणांना रोज जीवघेणा प्रवास करावा लागतोय. हे सर्वजण पहाटेच्या सुमारास पावणे चारला घर सोडतात. त्यानंतर त्यातील काहीजण लिफ्ट मागून तर काहीजण स्वतःच्या दुचाकीने शहापूर डेपोपर्यंत येतात. यानंतर एसटी महामंडळाच्या बसने ठाण्याच्या कोपर डेपोपर्यंत ते प्रवास करतात. यानंतर पुन्हा बेस्टने प्रवास करत सायनपर्यंत येतात आणि त्यानंतर पुन्हा मिळेल त्या वाहानाने कस्तुरबा रुग्णालयात पोहचतात. यासाठी त्यांना येताना साडेचार तास आणि जाताना साडेचार तास असा मिळून तब्बल 9 तास दररोज प्रवास करावा लागतं आहे.
Coronavirus | राज्यात कालपासून 113 नवे कोरोना बाधित, रुग्णांची संख्या वाढून 748 वर
वेळसोबत आर्थिक भुर्दंड
या कर्मचाऱ्यांना प्रवासासाठी रोजचे तीनशे ते साडेतीनशे रुपए मोजावे लागत आहेत. इतरवेळी ते महिना 400 रुपये पासने आसनगाव किंवा वाशिंड रेल्वे स्थानकातून येतं असतात. या सर्व मंडळीना आपल्या कर्तव्यापुढे याचे काहीच वाटत नाही. परंतु त्यांना एक अडचण मात्र चांगलीच सतावतेय. जर सायन, केमच्या बसवाल्यांना कस्तुरबा रुग्णालयाचा स्टाफ सांगितलं तर त्यांना गाडीत घेत नाहीत. अशीच परिस्थिती इतर वाहनांमध्ये देखील जाणवतेय. परंतु, रुग्णसेवेपुढे अशा अडचणी काहीच नाहीत, असं त्यांचं म्हणणं आहे.
कोरोना चाचणी 45 मिनिटात करण्यास सक्षम अशा 10 मशीन अडकल्या निविदा प्रक्रियेत
राज्यात कोरोनाचा आकडा वाढला
आज राज्यात 113 नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 748 झाली आहे. आज राज्यात 13 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी आठजण मुंबईतील, 3 जण पुण्याचे तर प्रत्येकी 1 रुग्ण कल्याण-डोंबिवली आणि औरंगाबाद येथील आहे. कोरोनामुळेमुराज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 45 झाली आहे.
Health Minister on #Corona | लॉकडाऊननंतरही देशातल्या सर्व जिल्ह्यांच्या सीमा दोन आठवडे सीलच राहण्याची शक्यता- केंद्रीय आरोग्यमंत्री