'किरीट सोमय्यांना शून्य अधिकार आहेत', निलम गोऱ्हेंची सोमय्यांवर टीका
एबीपी माझा वेब टीम | 30 Nov 2016 11:20 PM (IST)
मुंबई: मुंबई महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचं किरीट सोमय्यांनी सांगितल्यानतंर त्याला शिवसेनेनं उत्तर दिलं आहे. 'किरीट सोमय्यांना शून्य अधिकार आहेत. त्यांना फक्त सकाळी आणि संध्याकाळी बेताल बोलण्याचे अधिकार आहेत.' अशा शब्दात नीलम गोऱ्हेंनी सोमय्यांना उत्तर दिलं आहे. नगरपालिकांच्या निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाल्यानंतर किरीट सोमय्यांनी स्वबळाची भाषा केली होती. त्यामुळे शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये शाब्दीक युद्ध रंगलं आहे. फेब्रुवारी महिन्यात मुंबईसह राज्यातील दहा महापालिकेच्या निवडणुका आहेत. त्यासाठी आतापासून तयारी सुरु आहे. नगरपालिका निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळालं आहे. त्याचा फायदा घेत आता महापालिका स्वबळावर लढण्याची तयारी सुरु केली आहे.