मुंबई : पीस टीव्हीच्या माध्यमातून इस्लाम धर्माचा प्रचार करणाऱ्या झाकीर नाईकवर अखेर एनआयएनं आरोपपत्र दाखल केलं आहे.

दहशतवादी कारवायांसाठी तरुणांना प्रवृत्त करणं, दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करणं आणि प्रक्षोभक भाषणं करणं, असे आरोप झाकीर नाईकवर ठेवण्यात आले आहेत.

इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनच्या माध्यमातून झाकीर नाईकनं तरुणांना दहशतवादासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.

दरम्यान, या आरोपपत्राला झाकीर नाईकच्या वकिलांनी विरोध केला असून, या प्रकरणात फरार आरोपीवर आरोपपत्र दाखल करता येत नाही असा युक्तीवाद त्यांनी केला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

बांगलादेशात झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील अतिरेकी हा झाकीर नाईकच्या भाषणांनी प्रभावित होता. त्यामुळे बांगलादेशात झाकीर नाईकच्या पीस टीव्हीवर बंदी घालण्यात आली. याशिवाय भारतातही हा चॅनेल बंद करण्यात आला आहे. तरुणांची माथी भडकावून, अशांतता निर्माण करत असल्याचा आरोप झाकीरवर आहे.

संबंधित बातम्या :

'झाकीर नाईक इस्लामला बदनाम करतो आहे'


मी शांतीदूत, मात्र युद्धात आत्मघाती हल्ले योग्य : झाकीर नाईक