यापूर्वी नागपूरच्या पावसाळी अधिवेशनात शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांच्या आंबा खाऊन अपत्य होण्याच्या वादग्रस्त विधानाचा निषेध करण्यासाठी भिडेंच्या वेशभूषेत आंदोलन केलं होतं. इतकंच नाही तर मोठा आंबा घेऊन ते विधानभवनात आले होते. या आंब्यांवर 'संभाजी भिडे यांच्या शेतातील आंबे', असंही लिहिलेलं होतं.
तसंच संतांच्या वेशभूषेत भजन-कीर्तनाच्या माध्यमातूनही प्रकाश गजभिये यांनी आंदोलन केलं होतं. आजही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रुपातील वेशभूष चर्चेचा विषय ठरली होती.