Anil Deshmukh Bail: अनिल देशमुखांच्या (Anil Deshmukh) जामिनाचा मार्ग मोकळा झाला असून जामिनाची स्थगिती वाढवण्याची सीबीआयची (CBI) मागणी मुंबई उच्च न्यायालयानं (High Court) फेटाळली आहे. तब्बल 1 वर्ष 1 महिना आणि 26 दिवसांनी अनिल देशमुखांची सुटका होणार आहे. दरम्यान, माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांची उद्या आर्थर रोड कारागृहातून सुटका होण्याची शक्यता आहे. 17 दिवसांच्या स्थगितीत जामीनाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात सीबीआयला अपयश आलं आहे. सीबीआयला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला आहे.
आजच्या सुनावणीत काय झालं?
माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाला आहे. जामिनाची स्थगिती वाढवण्याची सीबीआयची मागणी उच्च न्यायालयानं फेटाळली आहे. सीबीआयला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यास मुंबई हायकोर्टानं नकार दिला आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाकडून अनिल देशमुखांना जामीन मंजूर करण्यात आला होता. पण, सीबीआयच्या मागणीनंतर देशमुखांच्या जामिनाला 10 दिवसांची स्थगिती (Stay on Bail Order) देण्यात आली होती. त्यानंतर सीबीआयनं न्यायालयाला विनंती करत देशमुखांच्या जामीन अर्जाला स्थगिती देण्याची मागणी केली होती. न्यायालयानं सीबीआयच्या विनंतीनंतर देशमुखांच्या जामिनाला स्थगिती दिली होती. त्यामुळे जामीन मिळूनही अनिल देशमुखांना तुरुंगातच राहावं लागलं होतं. अखेर आज हायकोर्टानं जामिनाची स्थगिती वाढवण्याची सीबीआयची मागणी फेटाळली आणि अनिल देशमुखांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.
Anil Deshmukh Bail : अनिल देशमुख यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा, CBIची याचिका कोर्टाने फेटाळली
ज्या प्रकरणी अनिल देशमुखांना अटक झालेली ते प्रकरण नेमकं काय?
माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांची उद्या आर्थर रोड कारागृहातून सुटका होणार आहे. 17 दिवसांच्या स्थगितीत जामीनाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात सीबीआयला अपयश आलं आहे. सीबीआयला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला आहे. त्यामुळे अनिल देशमुखांच्या सुटकेचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी त्यावेळचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दरमहा 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे आदेश दिल्याचा आरोप केला होता. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणी सीबीआयनं प्राथमिक चौकशीनंतर अनिल देशमुखांसह अन्य काहीजणांच्या विरोधात गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर या प्रकरणाला अनेक फाटे फुटले. परमबीर सिंहांचा लेटर बॉम्ब, आता या प्रकरणाची सुनावणी मुंबई सत्र न्यायालयात सुरू आहे.
1 नोव्हेंबर 2021 ईडी चौकशीसाठी गेलेल्या अनिल देशमुखांना ईडीकडून अटक करण्यात आली. ईडीनं देशमुखांवर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला. ईडीनं अटक केल्यानंतर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सीबीआकडूनही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे देशमुख एकाच वेळी दोन तपास यंत्रणांकडून दोन गुन्ह्यांप्रकरणी अटकेत होते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :