मुंबई: महिला व बालविकास विभागात झालेल्या पूरक पोषण आहार घोटाळ्याची एसीबीकडून चौकशी करण्यात यावी तसंच ही चौकशी होईपर्यत मुख्यमंत्र्यांनी पंकजा मुंडे यांना पदावरुन हटवावं अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसनं केली आहे.
एकूण साडेसहा हजार कोटींचा हा घोटाळा पंकजा मुंडे आणि विनिता सिंघल यांच्या संगनमतानं करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नवाब मलिक यांनी केला आहे. विनिता सिंघल या महिला बालविकास विभागाच्या आयुक्त असून तीन महिन्यांपूर्वी त्यांची बदली होऊनही त्या अद्याप त्याच पदावर असल्याचं नवाब मलिक यांचं म्हणणं आहे.
या योजनेतील टेंडरसंबंधी अटी मंत्री पंकजा मुंडे यांनी बदलायला लावल्या. त्यामुळे या प्रकरणाची एसीबीमार्फत चौकशी करावी. असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.