Sharad Pawar Bhima Koregaon Case : चार वर्षांपूर्वी भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज चौकशी आयोगाच्या कार्यालयात हजेरी लावली. भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी आयोगाने शरद पवार यांना साक्ष नोंदवण्यासाठी २३फेब्रुवारीला उपस्थित राहण्याच समन्स पाठवण्यात आलं होते. मात्र, दिवशी उपस्थित राहता येणार नसल्याचे त्यांनी आयोगाला सांगितले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज सकाळीच राज्य माहिती आयोगाच्या कार्यालयात उपस्थित राहिले. जवळपास एक तास कार्यालयात उपस्थित होते. या तारखेला उपस्थित राहणं शक्य नसल्याने पुढील तारीख घेण्यासाठी पवार आयोगाच्या कार्यालयात गेल्याची सुत्रांची माहिती आहे. त्यामुळे २३ फेब्रुवारीला पवार उपस्थित राहणार का? आणि नेमकी भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी आपली काय भूमिका मांडणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. 


शरद पवार यांनी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्यामुळे हिंसाचार भडकली असल्याचे म्हटले होते. त्या वक्तव्यावर शरद पवार यांच्या चौकशीची मागणी करण्यात आली होती. 


एक जानेवारी 2018 रोजी पुण्यातील भीमा-कोरेगाव येथे हिंसाचार झाला होता. या हिंसाचारात अनेक जण जखमी झाले होते. या हिंसाचारानंतर जातीय तेढ वाढली होती. या हिंसाचार प्रकरणाची चौकशी करण्याची घोषणा तत्कालीन राज्य सरकारने केली होती.


शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांची साक्ष नोंदवण्याची मागणी करणारा अर्ज आयोगाकडे सादर करण्यात आला होता. त्यानंतर शरद पवार यांनी याआधी साक्ष नोंदवली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा आपली साक्ष नोंदवली. आपल्या साक्षीत शरद पवार यांनी काय भूमिका मांडली याचा तपशील अद्याप बाहेर आले नाहीत. शरद पवार यांची साक्ष नोंदवल्यानंतर पुणे पोलीस अधीक्षक आणि इतरांच्या साक्षी नोंदवण्यात येणार आहे. 


निवृत्त न्यायमूर्ती जे. एन. पटेल आणि सुमित मलिक यांच्या अध्यक्षतेखाली या आयोगाची चौकशी सध्या चौकशी सुरू आहे. 1 जानेवारी 2018 मध्ये पुण्यातील कोरेगाव-भीमा इथं झालेल्या घटनेनं राज्यभरात दंगल उसळली होती. या दंगलीबाबत स्थानिक रहिवासी अनीता सावळे यांनी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यासह अन्य काहीजणांविरोधात पुणे ग्रामीण पोलिसांत तक्रार दिली आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फौजदारी फिर्याद नोंदविली गेली आहे.