Ncb zonal director Sameer Wankhede : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर राज्यातील मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) आणि एनसीबी आधिकारी समीर वानखे यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंवर गंभीर आरोप करत वर्षभरात तुरुंगात टाकणार, असं आव्हान दिलं होतं. कोरोना काळात सगळे सेलिब्रिटी मालदीवमध्ये असताना समीर वानखेडे आणि त्यांचे कुटुंबीय मालदीवमध्ये होते, असा दावाही नवाब मलिक यांनी केला. तसेच, त्यासंदर्भातले फोटोही सोशल मीडियावर पोस्ट केले होते. मलिकांच्या या आरोपावर एनसीबी आधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.
नवाब मलिकांनी माझ्यावर जे खंडणीचे खोटे आरोप लावले आहेत त्याची मी निंदा करतो, अशी थेट प्रतिक्रिया वानखेडे यांनी दिली. ते म्हणाले की, ‘मी एक सरकारी कर्मचारी आहे, ते खूप मोठे मंत्री आहेत. देशाची सेवा इमानदारीने करण्यासाठी आणि ड्रग्ज विरोधात लढा उभा केला म्हणून जर त्यांना मला जेलमध्ये टाकायचं असेल तर मी त्याचं स्वागत करतो. मी मालदिव गेलो होतो, सरकारची रितसर परवानगी घेऊन मी कुटुंबासमवेत गेलो होतो. आता तुम्ही याला खंडणी म्हणाल का? जे फोटो त्यांनी ट्विट केले आहेत ते मुंबईतील हॉटेलचे फोटो आहेत. मी कुठे होतो याची त्यांनी माहिती घ्यावी. एअरपोर्टमधून डेटा घ्यावा. दुबईत जाण्यासाठी पासपोर्ट लागतो, व्हिसा लागतो… मागील १५ दिवसांपासून माझ्या मृत आईवर, निवृत्त वडिलांवर, बहिणीवर आणि माझ्यावर देखील वैयक्तिक अटॅक करण्यात येत आहे. समीर वानखेडे यांनी पत्रकारांसोबत बोलताना नवाब मलिक यांच्या प्रत्येक आरोपाला उत्तर दिलं आहे. तसेच मलिकांच्या आरोपाला वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करुन कायदेशीर उत्तर देणार असल्याचे वानखेडे यांनी सांगितंलं.
नवाब मलिक काय म्हणाले?
समीर वानखेडे मालदीवलाही गेले नसलयाचं त्यांच्या बहिणीने म्हटलं होतं. त्यानंतर एनसीबीनं प्रसिद्धीपत्रक जारी करत समीर वानखेडे कुटुंबासोबत मालदीवला गेले होते, असं सांगितलं. त्यांनी दुबाईत गेल्याचं नाकारलेय, पण त्यांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेले आहेत. समीर वानखेडे कायदेशीर कारवाई करणार, यावर बोलताना नवाब मलिक म्हणाले की..देशात कायदाव्यवस्था आहे. ते कायद्याचा मार्ग स्वीकारु शकतात. त्यांच्याप्रमाणेच मलाही कायद्याचा मार्ग आहे.
राज्याचे गृहमंत्री काय म्हणाले?
केंद्रीय तपास यंत्रणेमार्फत काम करत असल्यामुळे राज्य सरकार समीर वानखेडेंना प्रश्न करु शकत नाही. नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपाबाबत मला कोणतीही माहिती नाही. त्यासंदर्भात मलिक यांनी अद्याप मला कोणतेही पुरावे दिलेले नाहीत. मी त्यांच्याकडून माहिती घेईल, असं राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले.