मुंबई : ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अभिनेत्री दीपिका पादुकोणची तब्बल साडेपाच तास चौकशी केली. यात ड्रग्जसंदर्भात चॅट केलं मात्र ड्रग्ज घेतलं नसल्याचे चौकशीदरम्यान दीपिकानं सांगितलं. दीपिका समाधानकारक उत्तर देत नसल्याची माहिती एनसीबी सूत्रांनी दिली आहे.


एनसीबीकडून समन्स आल्यानंतर आज दीपिका पादुकोण निर्धारित वेळेआधी दहा मिनिटं एनसीबी कार्यालयात पोहोचली. दीपिकाची तब्बल साडेपाच तास चौकशी करण्यात आली. दीपिकानं ड्रग्ज चॅटसंदर्भात कबुली दिली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मात्र आपण ड्रग्जचं सेवन केलं नसल्याचं तिनं सांगितलं असल्याचीही माहिती आहे. दीपिकाकडून काही प्रश्नांची समाधानकारक उत्तरं मिळाली नसल्याची देखील माहिती आहे.


Drugs Case : दीपिकानं ड्रग्ज चॅटची कबुली दिल्याची सूत्रांची माहिती, श्रद्धा, साराचीही चौकशी सुरु


दरम्यान, जवळपास 12 वाजेच्या सुमारास श्रद्धा कपूर देखील एनसीबीच्या कार्यालयात पोहोचली. तिची देखील चौकशी एनसीबीने केली. तर सारा अली खान देखील एनसीबी कार्यालयात पोहोचली. या दोघींचीही चौकशी सुरु आहे. एनसीबीने अभिनेत्री दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह आणि सिमोन खंबाटा यांच्यासह सात जणांना समन्स बजावले आहेत. आज दीपिका पादुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने चौकशीसाठी बोलावलं होतं. ड्रग्जबाबत चर्चा करणारी काही व्हॉट्सअ‍ॅप चॅट एजन्सी रडारवर आहे. दीपिक पादुकोणची व्यवस्थापक करिश्मा प्रकाश आणि “डी” यांच्यात हे व्हॉट्सअॅप चॅट झाले आहेत, असं सूत्रांनी सांगितले. अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यूच्या अंमली पदार्थांच्या कनेक्शननंतर बॉलिवूडमधील अनेक मंडळींची नावं यात समोर आली आहेत.


एनसीबी कार्यालयात येण्यासाठी दीपिकाकडून साध्या कारचा वापर


बॉलिवूड मधील आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोण हिला आज ड्रग्ज संदर्भात एनसीबीने चौकशीसाठी समन्स बजावले होते. दीपिका वेळेच्या 10 मिनीटं आधीचं कार्यलयात पोहचली. मात्र, दीपिकाची कार पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटलं. कारण, अलिशान वाहनांमधून फिरणारी दीपिका अचानक साध्या कारने का आली? मात्र, पत्रकारांचा फेरा चुकवण्यासाठी दीपिका साध्या कारने कार्यलयात आली असल्याचे सांगितले जात आहे.


मी ड्रग्ज घेतले नाही असं म्हणून चालणार नाही, तर त्यांना खुलासा द्यावा लागेल : वकील अनिकेत निकम