नवी मुंबई महापालिकेकडून दिवाळी बोनसची घोषणा
विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई | 05 Oct 2016 11:21 PM (IST)
नवी मुंबई: नवी मुंबई महापालिकेनं कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीची भेट जाहीर केली आहे. महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 16 हजार दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला आहे. पालिका कर्माचाऱ्यांसोबतच कंत्राटी कामगारांना देखील 8 हजार 500 रूपये सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आला आहे. नवी मुंबई महापालिकेतील 3 हजार 799 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना याचा फायदा मिळणार आहे.