नवी मुंबई : खारघर येथील सेक्टर-4 येथे नव्यानेच हॉटेल चालवणाऱ्या व्यावसायिकाला 50 हजार रुपयांची खंडणी न दिल्याने भाजप नगरसेवकाने बेदम मारहाण केली होती. मारहाण करणाऱ्या भाजप नगरसेवक शत्रुघ्न काकडे यांना पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत.
आपल्या गुंडांना घेऊन हॉटेलमध्ये येत धुमाकूळ घालणाऱ्या भाजप नगरसेवक शत्रुघ्न काकडे याचा प्रताप सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात नगरसेवक शत्रुघ्न काकडे आणि त्याच्या साथीदारांवर खंडणी मागणे, मारहाण करणे असे गंभीर गुन्हा दाखल करण्यात आले होते. दोन दिवसांपासून आरोपी फरार होते. आज खारघर पोलीसांनी शत्रुघ्न काकडेसह चार आरोपींना अटक करुन, पनवेल कोर्टात हजर केले असता, 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
या मारहाणीत जखमी झालेले इम्तियाज शेख यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
नेमकं काय प्रकरण आहे?
नवी मुंबईतील खारघर इथल्या सेक्टर 4 इथे नवीन हॉटेल चालवणाऱ्या व्यावसायिकाला 50 हजार रुपयांची खंडणी न दिल्याने भाजप नगरसेवकाने बेदम मारहाण केली. आपल्या गुंडांना घेऊन हॉटेलमध्ये येत धुमाकूळ घालणाऱ्या नगरसेवक शत्रुघ्न काकडे यांचा प्रताप सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या मारहाणीत जखमी झालेले हॉटेल मालक इस्माईल शेख यांच्यावर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक शत्रुघ्न काकडे यांनी अनेक कार्यकर्त्यांसह इस्माईल यांच्या हॉटेलमध्ये जाऊन त्यांना आणि कामगारांना बेदम मारहाण केली. याप्रकरणी खारघर पोलिस ठाण्यात भाजप नगरसेवक शत्रुघ्न काकडे, त्यांचे नातेवाईक आणि साथीदार अशा दहा जणांवर खंडणी मागणं, मारहाण करणं असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर शत्रुघ्न काकडे फरार होता.
खारघरमध्ये अशाप्रकारे गावगुंडांचा त्रास व्यावसायिकांना होत असल्याने त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
खंडणीसाठी मारहाण, भाजप नगरसेवकाला अखेर बेड्या
विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई
Updated at:
14 Aug 2018 10:41 PM (IST)
आपल्या गुंडांना घेऊन हॉटेलमध्ये येत धुमाकूळ घालणाऱ्या भाजप नगरसेवक शत्रुघ्न काकडे याचा प्रताप सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -