पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला बस स्थानकाजवळ उभी होती, त्यावेळी तिथे उभ्या असलेल्या तीन जणांसोबत तिचा काहीतरी वाद झाला. विशेष म्हणजे वादानंतर महिलेने स्वतःच्या गाडीतून यावेळी पेट्रोलचा कॅन काढला आणि संशयितांसोबत झालेल्या झटापटीत पेट्रोलचा भडका उडाला. मात्र आग कुणी लावली हे अद्याप समोर आलेलं नाही. या घटनेत महिला 67 टक्के भाजली आहे. घटनेनंतर संशयितांनी घटनास्थळावरुन पळ काढला. उपस्थित नागरिकांच्या मदतीने पीडित महिलेला तात्काळ नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र पुढील उपचारासाठी तिला मुंबईच्या भायखळा येथील मसीना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
Nashik | लासलगाव जळीतकांडातील आरोपीचा व्हिडीओ व्हायरल, पीडितेनं स्वतःला पेटवून घेतल्याचा दावा
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि त्यानंतर नाशिकमध्ये शनिवारी मुक्कामी असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पीडितेची भेट घेत तिची विचारपूस केली. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांवर कठोर शासन झालेच पाहिजे, मात्र सध्या ही महिला वाचणे गरजेचं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. बाटलीत पेट्रोल मिळणे हा अपराधच असून असं पेट्रोल पंपावर होत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
Nashik | लासलगाव जळीतकांड प्रकरणातील पीडितेला उपचारासाठी मुंबईत हलवलं, प्रकृती गंभीर | ABP Majha