Continues below advertisement

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे लहान बालकांशी किती आपुलकीने वागतात हे अनेकदा दिसून आलं आहे. लहानग्यांशी वागताना ते त्यांच्यापैकीच एक होऊन जातात आणि धम्माल करतात. असाच प्रसंग दिल्लीतील एका लग्नसोहळ्यात घडल्याचं दिसून आलं. यावेळी तो लहान मुलगा मात्र दुसरा तिसरा कुणी नसून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा नातू किआन ठाकरे (Raj Thackeray Grandson) होता.

अमित ठाकरे यांची पत्नी मिताली ठाकरे यांच्या भावाचे डॉ. राहुल बोरुडे यांचा लग्नसोहळा 5 डिसेंबर रोजी दिल्ली येथे पार पडला. या लग्नासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. तसेच या लग्नकार्यक्रमात अनेक राजकीय मंडळी देखील उपस्थित होती.

Continues below advertisement

Raj Thackeray Grandson : मोदींनी ओढले ठाकरेंच्या नातवाचे गाल

मिताली ठाकरे यांचे बंधू डॉ. राहुल बोरुडे यांच्या लग्नसोहळ्यासाठी नरेंद्र मोदी उपस्थित होते. पंतप्रधान स्टेजवर गेले असताना फोटोसेशन सुरू होते. त्यावेळी खालून अमित ठाकरे हे त्यांच्या मुलाला घेऊन स्टेजवर गेले. अमित ठाकरे पंतप्रधानांच्या जवळ जाताच त्यांनी किआन ठाकरे (Kiaan Thackeray) याचे गाल ओढले. त्यानंतर अमित ठाकरे हे किआनसोबत मोदींच्या बाजूला उभे राहिले आणि पुन्हा फोटोसेशन पार पडलं.

ही बातमी वाचा: