मुंबई : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष दिवंगत नरेंद्र दाभोलकर (Narendra dabholkar) यांनी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी, सीबीआयच्या विशेष न्यायालायने दोन आरोपींना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यामध्ये, सचिन अंदुरे (Sachin Andure) आणि शरद कळसकर (Sharad Kalaskar bail) यांना दोषी ठरवण्यात आलं. तर, इतर तीन आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. मात्र, सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना सश्रम जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यापैकी, दोषी शरद कळसकरला मुंबई उच्च न्यायालयाकडून (Highcourt) जामीन मंजूर करण्यात आल्याने आता त्याची सुटका होणार आहे.
नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात सीबीआयच्या विशेष न्यायालयाने आरोपी वीरेंद्र तावडे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना सबळ पुराव्याअभावी न्यायालयानं निर्दोष ठरवलेलं आहे. तर, सचिन अंदुरे आणि शरद कळसकर हे जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. शरद कळसकरला विशेष न्यायालयाने 2024 मध्ये दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती, या निर्णयाला त्याने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. तसेच, आपल्या अपिलावर निर्णय येईपर्यंत जामीन देण्याची मागणी देखील कळसकर याच्या वकिलांनी केली होती. त्यानुसार, उच्च न्यायालयात झालेल्या जामीन अर्जावरील सुनावणीत शरद केळसकरला 50 हजारांच्या हमीवर जामीन मंजूर करण्यात आली आहे.
सचिन अंदुरे आणि शरद कळसकर दोषी (Narendra dabholkar case)
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयच्या विशेष कोर्टानं सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना दोषी ठरवलेलं आहे. पुणे महानगरपालिकेचा सफाई कर्मचारी आणि मॉर्निंग वाॅकला आलेल्या एका व्यक्तीच्या जबाबाच्या आधारे अंदुरे आणि कळसकर यांना दोषी ठरवलं आहे. 5 लाख रुपये दंड किंवा तो न भरल्यास अतिरिक्त एक वर्षाचा कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या 20 ऑगस्ट 2013 रोजी करण्यात आली होती. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप सीबीआयनं वीरेंद्र तावडे यांच्यावर केला होता. मात्र, वीरेंद्र तावडे यांना सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्त करण्यात आलं आहे. याशिवाय संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना न्यायालयानं निर्दोष ठरवलं आहे.
फाशीची शिक्षेऐवजी जन्मठेप (life imprisionment)
सीबीआयच्या विशेष न्यायालयानं सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना सश्रम आजन्म जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली नाही. सबळ पुराव्याअभावी तिघे जण निर्दोष सुटणं हे सीबीआयचं अपयश मानलं जातंय.
हेही वाचा
मोठी बातमी! उद्धव ठाकरे नाहीच, ठाकरेंच्या शिवसेनेकडून अंबादास दानवेंना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर
