मुंबई : "युती तोडणं ही शिवसेनेची कमजोरी आहे. पक्षात बंडखोरी होऊ नये यासाठी हा निर्णय घेतला आहे. युती होणार नाही हे मी आधीच सांगितलं होतं आणि ते झालंच," अशा शब्दात काँग्रेस नेते नारायण राणे यांनी शिवसेनेवर प्रहार केला.

एबीपी माझा सर्व्हे: शिवसेना स्वबळावर मुंबई पालिका काबीज करू शकेल?


'राज्यातील सर्व महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका स्बळावर लढणार असल्याची गर्जना, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल (गुरुवार) गोरेगावच्या पदाधिकारी मेळाव्यात हजारो शिवसैनिकांच्या उपस्थितीत केली.

शिवसेना-भाजपची युती तुटली, महाराष्ट्रात शिवसेना स्वबळावर लढणार


याबाबत बोलताना नारायण राणेंनी शिवसेनेवर बोचरा वार केला. "युती तोडूनही शिवसेना सत्तेत आहे. सत्तेसाठी शिवसेना लाचार आहे. सत्तेतील युती तोडण्याची धमक उद्धव ठाकरेंमध्ये नाही," अशी जळजळीत टीका राणे यांनी केली.

'युती तुटल्याचं अतीव दुःख झालं', शरद पवारांची खोचक प्रतिक्रिया


नारायण राणे म्हणाले की, "एकीकडे युती तोडायची भाषा करायची दुसरीकडे शिवसेनेचे मंत्री कॅबिनेटमध्ये भाजपच्या मांडीला मांडी लावून बसणार, असं कसं? याला युती तोडणं बोलतात का?"

जे येणार नाहीत, त्यांच्या शिवाय परिवर्तन होणारच!: मुख्यमंत्री


"उद्धव ठाकरेंचें हात बांधले गेले आहेत, ते का आणि कसे हे मी सांगणार नाही, त्यामुळे सत्तेतून बाहेर पडू शकत नाही. शिवसेना कमजोर झाली आहे. हे घडणार होतं, त्यामुळे मला वाईट वाटत नाही, असंही राणे म्हणाले.


संबंधित बातम्या

मुंबई महापालिकेतील घोटाळ्यांची 'काळी पत्रिका' तयार : सोमय्या


राज्यात युतीचं सरकार 5 वर्ष टिकणार: रावसाहेब दानवे


...म्हणून मुख्यमंत्र्यांनी त्यानंतर उद्धव ठाकरेंना फोन केला नाही: सूत्र