मुंबई : राज्यात कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत आहे. आरोग्य व्यवस्थेवर ताण येत आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री 'मातोश्री'मधून बाहेर पडत नाही, ते कोरोना रुग्णांना कसं सांभाळणार? अशी टीका भाजप नेते नारायण राणे यांनी केली. गेल्या काही काही दिवसांपासून महाराष्ट्राला कोरोना लस पुरवठा करण्यात केंद्र सरकार दुजाभाव करत असल्याची टीका राज्य सरकार करत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते नारायण राणे यांनी पत्रकार परीषद घेत महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.
ठाकरे सरकारमधील केंद्र सरकार मदत करत नसल्याची टीका करत आहे. मात्र, कोरोनावर उपाययोजना करण्यात महाराष्ट्र सरकार कमी पडलं आहे. हे अपयश झाकण्यासाठी राज्य सरकारमधील नेते केंद्रावर टीका करत असल्याची पलटवार नारायण राणे यांनी केला. लसीच्या तुटवड्याबाबत ठाकरे सरकार केंद्राकडे बोट दाखवत आहे. वरुन विरोधीपक्षांनी राजकारण करु नका असे सांगतायेत. मात्र, केंद्राने मुबलक मदत करुनही ठाकरे सरकार राजकारण करत असल्याची टीका राणे यांनी केली.
नारायण राणे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे.
- सचिन वाझे प्रकरणात राज्याचे प्रमुख सहभागी
- महाराष्ट्रात कोरोना रुग्ण वाढत आहे, एकाही मंत्र्यांनं आतापर्यंत रुग्णालय सुरु केलं नाही.
- लॉकडाऊन करायला राज्य विकत घेतलंय का?
- कुठल्याही खात्याचा कारभार सुरुळीत सुरु नाही.
- कंत्राटदारांना काम न करताच पैसे दिले जात आहे.
- राज्यात सामान्य नागरीक, व्यापारी त्रस्त, राज्याची आर्थिक घडी बसवायला 5 वर्ष लागतील.
- केंद्राने सगळी मदत करुनही राज्य सरकार राजकारण करत आहे.
- शिवसेना नेते अनिल परब कोणासाठी पैसे गोळा करत होते.
- सिंगापूरचं स्वप्न दाखवून मुंबईला भकास केलं.
- बीएसटीची आजची अवस्था दयनीय आहे.
- संपूर्ण देशात महाराष्ट्राची बदनामी होत आहे.
- कोरोनाच्या लढ्यात मुख्यमंत्री कोठे होते?