Nana Patole : जनतेला सरकारवर विश्वास राहिला नसल्याची टीका काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केली आहे. शेतकरी सरकारच्या विरोधातच झाला आहे. कर्जमाफीसंदर्भात सरकारनं अटी वगैरे काढू असं सांगितलं आहे. पण सरसकट कर्जमाफी करावी अशी आमची मागणी होती. कालही होती आणि आजही हीच मागणी आहे. शेतकऱ्यांच्या पिकांना हमीभाव देण्याची मागणी होती. धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस संदर्भात नंतर बोलू असं सांगितल्याचे नाना पटोले यावेळी म्हणाले. सरकारनं आज कर्ममाफीसंदर्भातील दोन अटी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर बोलताना पटोलेंनी सरसकट कर्जमाफीची मागणी केली आहे. 

राज्याची बदनामी तुमच्या भ्रष्टाचाराने केलीय

मिसिंग लिॅकसंदर्भात आज पण सांगितलं आहे की, निसर्गाने पाप उघडं केलं आहे. 540 कोटी प्रति किमी खर्च केले आहेत. इतका खर्च केला तर फुलप्रुफ असला पाहिजे ना. राज्याची बदनामी तुमच्या भ्रष्टाचाराने केली आहे अशी टीका काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केली. राज्यात लोकशाही राहिली नाही, बघून घेईल पाहून घेईल, असं कधीच नव्हतं. तुम्ही आमच्या विरोधात बोलाल तर पाहून घेईल हे बोलणं चुकीचं असल्याचे नाना पटोले यावेळी म्हणाले. फडणवीस काय माझे व्यक्तिगत शत्रू नाहीत.  

सत्तेच्या नावाने लूट करणारी माणसं बसली आहेत

सिद्धिविनायक, साईबाबा शिर्डी, पंढरपूरच्या मंदिरात गडबड आहे, सरकारनं ताब्यात घेतली आहेत. देवस्थानं आपल्या ताब्यात आहेत, त्यांची परिस्थिती काय? सत्तेच्या नावाने लूट करणारी माणसं बसली आहेत असी टीका नाना पटोले यांनी केली.  गजानन महाराजांच्या शेगावचा हिशोब व्यवस्थित आहेत, तिथे कुठेही ट्रस्ट नाही. पारदर्शकता किती हे आम्ही सांगू शकतो. बहुमताच्या आधारावर फसवलं जात असल्याचे  नाना पटोले म्हणाले.  

खासगी विद्यापीठांना मोठं स्थान दिलं जातय, गेल्या 10 वर्षात 2 हजार 560 शाळा बंद झाल्या 

खासगी विद्यापीठांना मोठं स्थान दिलं जात आहे. शिक्षण व्यवस्थेला घरघरच लागली आहे. सरकार 4 टक्के खर्च करत आहेत, भुतान, मालदिव असे अधिक खर्च करतात. शाळेंची दयनीय अवस्था आहे. गेल्या 10 वर्षात 2 हजार 560 शाळा बंद झाल्या आहेत. ही परिस्थिती झाली आहे. गोरगरीबांच्या मुलांना शिक्षण राहिलेले नाही. बोगस विद्यापीठे आणली जात आहे, सिंगापूर मार्गे येतायत.  मोठं व्हिजन दाखवलं जातं आहे. मोफत जागा ही लोकं देणार आहेत, शिक्षण व्यवस्थेचे 3/13 वाजवले आहेत असं म्हणत नाना पटोले यांनी टीका केली. 

a