एक्स्प्लोर

Nalasopara Crime News: किरकोळ भांडण, भावानं विवाहीत बहिणीवर केले सपासप वार, आईलाही सोडले नाही, नालासोपाऱ्यात महिलेचा दुर्दैवी मृत्यू

Nalasopara Crime News: टाकी रोड येथील सर्वोदय वसाहतीत साईधाम वेल्फेअर चाळ आहे. या चाळीत सुप्रिया कानडे (३५) ही महिला राहते. तिची आई आणि भाऊ शेजारीच राहतात.

नालासोपारा : नालासोपारा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, मनोरुग्ण भावाने आपल्या सख्ख्या बहिणीची कोयत्याने वार करून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या आईवरही मुलाने हल्ला  (Nalasopara Crime News) केला. नालासोपारा पूर्वेच्या टाकी रोड येथील सर्वोदय वसाहतीत आज (मंगळवारी, ता २४) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे. वसई विरार शहरातील एकाच आठवड्यातील ही चौथी हत्या आहे. (Nalasopara Crime News) 

नेमकं काय घडलं?

टाकी रोड येथील सर्वोदय वसाहतीत साईधाम वेल्फेअर चाळ आहे. या चाळीत सुप्रिया कानडे (३५) ही महिला राहते. तिची आई आणि भाऊ शेजारीच राहतात. महिलेचा पती गावी गेला होता. आज (मंगळवारी, ता २४) पहाटे तिचा सख्खा भाऊ अजित मालुष्टे (४०) याच्यासोबत भांडण झाले. या भांडणात अजित मालुष्टे (४०) याने कोयत्याने  (Nalasopara Crime News) तिच्यावर वार केला. तिच्या मानेवर आणि छातीवर कोयत्याचे वार झाल्याने ती या हल्ल्यात गंभीर जखमी झाली आहे. भांडण सोडविण्यासाठी त्यांची आई मध्ये पडली तेव्हा अजितने तिच्यावरही वार केले. ती गंभीर जखमी झाली. या घटनेमध्येच सुप्रियाचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी असलेल्या आईला पालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Nalasopara Crime News) 

मला सकाळी साडेपाच वाजता या घटनेची माहिती मिळाली, तेव्हा सुप्रिया रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिचा भाऊ मनोरुग्ण होता. त्याने कोयत्याचा वार करून तिची हत्या केली अशी माहिती स्थानिक रहिवाशी महेंद्र कदम यांनी दिली. तुळींज पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली आहे. (Nalasopara Crime News) 

हल्ला करणारा भाऊ मनोरूग्ण

पुढे बोलताना परिसरातील रहिवासी महेंद्र कदम यांनी सांगितलं की, मला समजलं शेजारी मोठं भांडण झालं आहे. त्या इमारतीमध्ये मी पहाटे पाच ते साडे पाच वाजण्याच्या सुमारास गेलो होतो. तिथे एका महिलेचा खून करण्यात आला होता. तिच्या लहान भावानेच तिला मारलं. मयत महिला आहे तिचे नाव सुप्रिया कानडे असं आहे, तर आरोपीचे नाव हे अजित मालुष्टे आहे. अजित मनोरूग्ण आहे, त्याच्यावरती उपचार सुरू आहेत, त्यानेच आपल्या बहिणीवर हल्ला केला त्यात त्याच्या बहिणीचा मृत्यू झाला तर मध्ये पडलेल्या आईवरती देखील त्याने वार केले आहेत, त्याची आई देखील जखमी झाली आहे, अशी माहिती परिसरात राहणाऱ्या रहिवाश्यांनी दिली आहे, तर या घटनेनं परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं,  पोलिस घटनेचा तपास करत आहेत.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

रोहित पवारांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, 45 मिनीटांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? 
रोहित पवारांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, 45 मिनीटांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? 
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
मुंबई विमानतळावर कस्टमची कारवाई, स्मग्लिंगचा माल पकडला, विदेशी चलन, सोनं, माणिक, ड्रग्स जप्त
मुंबई विमानतळावर कस्टमची कारवाई, स्मग्लिंगचा माल पकडला, विदेशी चलन, सोनं, माणिक, ड्रग्स जप्त
सावधान! मुंबईसह राज्यात उन्हाचा चटका वाढला, तापमानाचा पारा 38 अंशावर, कोणत्या भागात किती तापमान?  
सावधान! मुंबईसह राज्यात उन्हाचा चटका वाढला, तापमानाचा पारा 38 अंशावर, कोणत्या भागात किती तापमान?  
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Jalgaon Banana : केळीचे दर 2.500 रुपयांवरुन 1500 रुपयांवर, युद्धाचा उत्पादकांना फटका
Ajit Pawar plane crash spot Baramati : AIB च्या अहवालात विमान झाडाला धडकल्याचा उल्लेख, फॅक्ट काय?
Jayant Patil on NCP Merger : विलिनीकरणाची चर्चा थांबली, ज्यांच्याशी चर्चा केली ते दादाच नाहीत
Sanjay Raut Mumbai PC : जे काय होईल ते एकमतानेच होईल सातवी जागा मविआ म्हणूनच जिंकू
Raj Thackeray MNS On BMC Ward Committees Election:उद्धव ठाकरेंच्या त्या निर्णयामुळे राज ठाकरे नाराज?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran vs America : भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू, व्हिडीओ जारी  
भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू
Iran Israel Conflict : पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 
ह्रदयद्रावक... वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
ह्रदयद्रावक... वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
Gold Rate : युद्ध लांबल्यास सोनं 2 लाखांवर जाण्याची शक्यता, सोन्यातील गुंतवणुकीची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या
युद्ध लांबल्यास सोनं 2 लाखांवर जाण्याची शक्यता, सोन्यातील गुंतवणुकीची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या
Who is Ali Larijani: अवघं नेतृत्व संपलं, मृत्यू अवघा छाताडावर नाचत असतानाही अमेरिका- इस्रायलला 'कधीही न विसरता येण्यासारखा धडा' शिकवणारा पडद्यामागचा इराणी 'सेनापती'
अली लारीजानी: अवघं नेतृत्व संपलं, मृत्यू अवघा छाताडावर नाचत असतानाही अमेरिका- इस्रायलला 'कधीही न विसरता येण्यासारखा धडा' शिकवणारा पडद्यामागचा इराणी 'सेनापती'
मुंबई विमानतळावर कस्टमची कारवाई, स्मग्लिंगचा माल पकडला, विदेशी चलन, सोनं, माणिक, ड्रग्स जप्त
मुंबई विमानतळावर कस्टमची कारवाई, स्मग्लिंगचा माल पकडला, विदेशी चलन, सोनं, माणिक, ड्रग्स जप्त
Embed widget