एक्स्प्लोर

मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी

मुंबई शहरात 8 आणि 9 ऑक्टोबर रोजी प्रोटोटाइप सायरन उपकरणाची चाचणी करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सायरनचा आवाज ऐकू आल्यास नागरिकांनी घाबरून जाऊ नये

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई (Mumbai) शहरावर पोलिसांची, सुरक्षा यंत्रणांची नेहमीच करडी नजर असते. येथील नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासन आणि सरकार तत्पर असते. मात्र, अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर असलेल्या या शहरात अनेकदा धडकी भरवणाऱ्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे, नागरिक काहीवेळा आपला जीव मुठीत धरुन प्रवास करतात. तर, दररोज हजारो पर्यटकही (Tourist) मुंबईत असतात. त्यामुळे, येथील लहानशी कृतीसुद्धा महत्त्वाची आणि लक्षवेधी ठरते. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई प्रशासनाकडून महत्त्वाचं आवाहन करण्यात आलंय.  

मुंबई शहरात 8 आणि 9 ऑक्टोबर रोजी प्रोटोटाइप सायरन उपकरणाची चाचणी करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सायरनचा आवाज ऐकू आल्यास नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आलं आहे. मुंबई शहरातील फोर्ट परिसरातील जुने सचिवालय आणि क्रॉस मैदानाजवळील नागरी संरक्षण महाविद्यालयाच्या इमारतींवर बसविण्यात आलेल्या सायरनची 8 आणि 9 ऑक्टोबर रोजी चाचणी घेण्यात येईल. यादरम्यान सायरन वाजविण्यात येणार आहे. 

तथापि, नागरिकांनी या सायरनचा आवाज ऐकून घाबरून जाऊ नये तसेच कोणताही गैरसमज करून घेऊन नये, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. महासंचालक  (नागरी संरक्षण, नवी दिल्ली) यांच्या मार्गदर्शनाखाली सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटीक्स (C-DOT) यांच्या पथकाद्वारे प्रोटोटाइप सायरन उपकरण तयार करण्यात आले आहे. सदर सायरन मुंबई शहरातील जुने सचिवालय, जोड इमारत, फोर्ट, मुंबई तसेच नागरी संरक्षण महाविद्यालय, क्रॉस मैदान, मुंबई येथील इमारतींवर बसविण्यात आले आहेत.  

सदर सायरन चाचणी ही पूर्वनियोजित असून कोणतीही प्रत्यक्ष आपत्कालीन परिस्थिती किंवा धोका निर्माण झालेला नाही. त्यामुळे, सायरनचा आवाज ऐकू आल्यास स्थानिक नागरिकांनी घाबरून जाऊ नये अथवा कोणताही गैरसमज करून घेऊ नये. नागरिकांनी सदर चाचणीसाठी प्रशासनास सहकार्य करावे व कोणतीही अनधिकृत माहिती अथवा अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 

हेही वाचा

दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त

About the author अजय माने

अजय माने
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास सर्वाधिक आनंदी मीच असेन; ओमराजेंचं वक्तव्य, आदित्य ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास सर्वाधिक आनंदी मीच असेन; ओमराजेंचं वक्तव्य, आदित्य ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया
Mantralaya Clerk Protest : मंत्रालयीन लिपिक संवर्गाचा शासनाविरोधात एल्गार, S-10 वेतनश्रेणीसाठी 18 नोव्हेंबरला निदर्शने, तर 25 नोव्हेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा
मंत्रालयीन लिपिक संवर्गाचा शासनाविरोधात एल्गार, S-10 वेतनश्रेणीसाठी 18 नोव्हेंबरला निदर्शने, तर 25 नोव्हेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार 
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार 
राहुल गांधींचा फोन टॅप हा आरोप नाही, वस्तुस्थिती; हर्षवर्धन सपकाळांची टीका, संजय राऊतांचाही मोदी-शाहांवर हल्लाबोल
राहुल गांधींचा फोन टॅप हा आरोप नाही, वस्तुस्थिती; हर्षवर्धन सपकाळांची टीका, संजय राऊतांचाही मोदी-शाहांवर हल्लाबोल
Advertisement

व्हिडीओ

Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha
Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट
Sanjay Raut PC : शरद पवार गट चर्चेलाच तयार नाही, मग सुनेत्रा पवार विलीनीकरण कोणासोबत करणार?
Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrakant Patil : बावड्यातील डी वाय पाटील महाविद्यालय कोणाच्या जागेवर उभे? आकुर्डीच्या जमिनीची माहिती काढा, सगळं समोर येईल; चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांना इशारा
बावड्यातील डी वाय पाटील महाविद्यालय कोणाच्या जागेवर उभे? आकुर्डीच्या जमिनीची माहिती काढा, सगळं समोर येईल; चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांना इशारा
Rinku Singh : 43 कोटी वाचवण्यासाठी दोन खेळाडूंना रिलीज करा,रिंकू सिंगला केकेआरचा कॅप्टन करा, माजी क्रिकेटपटूनं फॉर्म्युला सांगितला...
केकेआरनं 'त्या' दोघांना रिलीज करावे, 43 कोटी वाचवावे, रिंकूला कॅप्टन बनवा, सल्ला कोणी दिला?
Mantralaya Clerk Protest : मंत्रालयीन लिपिक संवर्गाचा शासनाविरोधात एल्गार, S-10 वेतनश्रेणीसाठी 18 नोव्हेंबरला निदर्शने, तर 25 नोव्हेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा
मंत्रालयीन लिपिक संवर्गाचा शासनाविरोधात एल्गार, S-10 वेतनश्रेणीसाठी 18 नोव्हेंबरला निदर्शने, तर 25 नोव्हेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास सर्वाधिक आनंदी मीच असेन; ओमराजेंचं वक्तव्य, आदित्य ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास सर्वाधिक आनंदी मीच असेन; ओमराजेंचं वक्तव्य, आदित्य ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया
NCP Merger : मोदींना डिलिमिटेशन विधेयक मंजूर करायचंय,15-16 मतांची त्यांना गरज, कदाचित त्यासाठी शरद पवारांच्या 8 खासदारांवर डोळा : पृथ्वीराज चव्हाण
मोदींना डिलिमिटेशन विधेयक मंजूर करायचंय,कदाचित त्यासाठी शरद पवारांच्या 8 खासदारांवर डोळा : पृथ्वीराज चव्हाण
MPSC पेपरफुटीसंदर्भात तक्रार, निवेदनं करण्यास मुदतवाढ; दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे चौकशी समितीचा निर्णय
MPSC पेपरफुटीसंदर्भात तक्रार, निवेदनं करण्यास मुदतवाढ; दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे चौकशी समितीचा निर्णय
NCP Merger: मोठी बातमी ! दिल्लीत सुप्रिया सुळे-प्रफुल पटेलांची बैठक; राष्ट्रवादीतील विलीनीकरणाच्या चर्चेला गती, सूत्रांची माहिती
मोठी बातमी ! दिल्लीत सुप्रिया सुळे-प्रफुल पटेलांची बैठक; राष्ट्रवादीतील विलीनीकरणाच्या चर्चेला गती, सूत्रांची माहिती
Gold Rate Weekly Update : सोन्याच्या दरातील घसरणीचा ट्रेंड कायम, पाच दिवसात सोनं 5000 रुपयांनी स्वस्त, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर IBJA कडून जारी
सोन्याच्या दरातील घसरणीचा ट्रेंड कायम, पाच दिवसात सोनं 5000 रुपयांनी स्वस्त, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर IBJA कडून जारी
Embed widget