एक्स्प्लोर

वरळीत हायप्रोफाईल कॉन्सर्टमध्ये तरुणाचा मृत्यू, पोलिसांकडून आयोजकांची चौकशी; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

संबंधित तरुणाने NSCI डोममधील कॉन्सर्टला हजेरी लावली होती. कार्यक्रमादरम्यान अचानक वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्याने रुग्णवाहिकेतून त्याला ब्रीच कँडी रुग्णालयात नेण्यात आले.

मुंबई : राजधानी मुंबईत (Mumbai) नेहमीच वेगवेगळ्या कॉन्सर्टचे आयोजन करण्यात येते, त्यामध्ये बडे सेलिब्रिटी, संगीतकार, गायक यांना बोलावून कार्यक्रम घेतले जातात. विशेष म्हणजे या कार्यक्रमास तरुणाई मोठ्या संख्येने सहभागी होते. मात्र, शनिवारी वरळी NSCI डोममध्ये आयोजित करण्यात आलेल्या कॉन्सर्टदरम्यान प्रकृती बिघडल्याने 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी ताडदेव पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद (ADR क्रमांक 17/2026) करण्यात आली आहे. पोलिसांकडून (Police) कॉन्सर्ट आयोजक कंपनीतील सदस्यांचीही चौकशी करण्यात येत आहे. 

प्राथमिक चौकशीनुसार, संबंधित तरुणाने NSCI डोममधील कॉन्सर्टला हजेरी लावली होती. कार्यक्रमादरम्यान अचानक वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्याने रुग्णवाहिकेतून त्याला ब्रीच कँडी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथे दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, त्याच कार्यक्रमात 31 वर्षीय एका महिलेचीही प्रकृती बिघडल्याची घटना घडली. तिला उपचारासाठी जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आवश्यक वैद्यकीय उपचारानंतर तिची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. चौकशीत महिलेने कार्यक्रमादरम्यान मद्य आणि एनर्जी ड्रिंक्सचे सेवन केल्याचे सांगितले असून, कोणत्याही अंमली पदार्थाच्या सेवनाबाबत माहिती समोर आलेली नाही. युवकाच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. कार्यक्रमस्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तसेच अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणांची तपासणी करण्यात येत असून, मृत्यूमागील कारणांचा शोध घेतला जात आहे.

वरळी कॉन्सर्ट कार्यक्रमादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव वृषभ गांगुर्डे असून तो वकिलीचे शिक्षण घेत होता. कोलकात्यावरून वृषभने वकिलीचं शिक्षण घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. तर, प्रज्ञान रे (28 वर्षे) ही तरुणी रुग्णालयात दाखल असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. स्पेसबाउंड या कंपनीने वरळी डोममध्ये या कॉन्सर्टचे आयोजन केले होते, त्यामुळे, स्पेसबाउंड कंपनीच्या आयोजकांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. या कॉन्सर्टसाठी प्रत्येक व्यक्तीला 4 हजार रुपये इतके तिकीट आकारण्यात आले होते.

एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, कारवाई होईल

वरळी डोममधील कॉन्सर्टमध्ये मृत्युमुखी पडलेल्या तरुणासंदर्भात पोलिस चौकशी करत आहेत. याप्रकरणी, जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करतील. गोरेगावमध्ये देखील कडक कारवाई करत पोलिसांनी खोलात पोलीस तपास केल्याचं एकनाथ शिंदेंनी म्हटलं.

हेही वाचा

बुलढाण्यातील शिवानी कळमेकर बनावट हत्याकांड प्रकरणी मोठी अपडेट, दोन पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन, ABP माझाच्या पाठपुराव्याला मोठं यश!

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather Updates: मान्सून पुन्हा सक्रिय; पुढील 12 तासांत 14 राज्यात वादळी पावसाचा इशारा, कुठेकुठे कोसळधारा?
मान्सून पुन्हा सक्रिय; पुढील 12 तासांत 14 राज्यात वादळी पावसाचा इशारा, कुठेकुठे कोसळधारा?
Nitin Gadkari : 'मला राजकारण समजायला उशीर झाला, पण...'; 'माझा सन्मान'मध्ये नितीन गडकरींनी उलगडले अनेक रंजक किस्से!
'मला राजकारण समजायला उशीर झाला, पण...'; 'माझा सन्मान'मध्ये नितीन गडकरींनी उलगडले अनेक रंजक किस्से!
धक्कादायक! प्रियकरासोबत हॉटेलमध्येच केली दारुची पार्टी, त्यानंतर झाली उलटी, मुंबईत 30 वर्षीय मुलीचा मृत्यू
धक्कादायक! प्रियकरासोबत हॉटेलमध्येच केली दारुची पार्टी, त्यानंतर झाली उलटी, मुंबईत 30 वर्षीय मुलीचा मृत्यू
Jackie Shroff : जॅकी दादा नेहमी सोबत झाड का घेऊन फिरतात? त्यांच्या कुंडलीमध्ये काय होतं? नेव्हीमध्ये न जाता ते 'हिरो' कसे बनले? रंजक किस्सा
जॅकी दादा नेहमी सोबत झाड का घेऊन फिरतात? त्यांच्या कुंडलीमध्ये काय होतं? नेव्हीमध्ये न जाता ते 'हिरो' कसे बनले? रंजक किस्सा
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Majha Sanman Award 2026: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा एबीपी माझा कडून सन्मान
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather Updates: मान्सून पुन्हा सक्रिय; पुढील 12 तासांत 14 राज्यात वादळी पावसाचा इशारा, कुठेकुठे कोसळधारा?
मान्सून पुन्हा सक्रिय; पुढील 12 तासांत 14 राज्यात वादळी पावसाचा इशारा, कुठेकुठे कोसळधारा?
Friends Story : जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
Maharashtra Live blog updates:: अहिल्यानगरमध्ये पोलिसांच्या लेखी आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन स्थगित; श्रीरामपूर बंदचा निर्धार कायम
Maharashtra Live blog updates:: अहिल्यानगरमध्ये पोलिसांच्या लेखी आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन स्थगित; श्रीरामपूर बंदचा निर्धार कायम
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
Dhanashree Verma: 'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
Embed widget