Mumbai Water Cut Probem : मागील काही दिवसांपूसन कोसळमाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचं पाणी कपातीचं टेन्शन संपलं आहे. पुढील वर्षांपर्यंत पुरेल इतका पाणीसाठी मुंबईजवळील तलावात साठला आहे. पुढच्या वर्षापर्यंत मुंबईला पाणीकपातीची चिंता नाही. कारण मुंबईच्या तलावांत 50 % पेक्षा जास्त पाणीसाठा झाला आहे. हा पाणीसाठा पुढील 189 दिवस इतका म्हणजे पुढील 16 जानेवारी 2023 पर्यंत पुरेल इतका आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात तलावात गेल्या 18 दिवसांत मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे तलावातील पाणीसाठ्यात 5,86,899 दशलक्ष लिटर पाणीसाठ्याची वाढ झाली  आहे. त्यामुळे मुंबईतील दहा टक्के पाणीकपातही रद्द झाली आहे. 


सध्या तलावांत 7,28,286 दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा झाला आहे. हा पाणीसाठा पुढील १८९ दिवस इतका म्हणजे पुढील १६ जानेवारी २०२३ पर्यंत पुरेल इतका आहे. त्यामुळे मुंबईकरांवरील संभाव्य पाणी कपातीचे संकट तूर्तास टळल्याने आता 'मुंबईकरांना पाणीकपातीचे 'नो टेन्शन'.
    
सात तलावांतून वर्षभराचा पाणीपुरवठा 
मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार व तुळशी या सात तलावांमधून दररोज 3,850 दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जातो. वर्षभरासाठी तलावात 14 लाख 47हजार 363 दशलक्ष लिटर इतक्या पाणीसाठ्याची आवश्यकता असते. 


24 जून ते 12 जुलैपर्यंत 18 दिवसांत 5,86,899 दशलक्ष लिटर पाणीसाठ्याची वाढ
 मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांत गतवर्षीच्या जून महिन्याच्या तुलनेत यंदाच्या जून महिन्यात सरासरी ७० टक्के कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे तलावांत 1,41,387 दशलक्ष लिटर म्हणजे फक्त 36 दिवस पुरेल इतका कमी पाणीसाठा शिल्लक होता. तसेच, तलावांत अपेक्षित पाऊस न पडल्याने आणि पाणीसाठयाने तळ गाठल्याने अखेर पालिकेने  27 जूनपासून दररोजच्या पाणीपुरवठ्यात 10 टक्के पाणी कपात लागू करण्याचा निर्णय 24 जून रोजी जाहीर केला होता.


सध्या सात तलावांत एकूण 7,28,280 दशलक्ष लिटर इतका म्हणजे मुंबईसाठी वर्षभरासाठी आवश्यक 14,47,363 दशलक्ष लिटर इतक्या पाणीसाठयाच्या ५० टक्के पेक्षाही जास्त पाणीसाठा जमा झालेला आहे. हा पाणीसाठा मुंबईकरांना पुढील 16  जानेवारी 2023पर्यंत पुरेल इतका आहे. तसेच, अद्यापही पावसाळ्याचे अडीच महिने बाकी आहेत. या कालावधीत आणखीन चांगला पाऊस पडला तर लवकरच तलाव एका मागोमाग एक असे 'ओव्हरफ्लो' व्हायला लागतील.