विद्यापीठाच्या स्टुडंट लॉ काऊन्सिलच्या विद्यार्थ्यांसोबत हा प्रकार घडला. यानंतर विद्यार्थ्यांनी याचा पाठपुरावा करुन, निकालाचा सर्व डेटा मिळवला. यात अनेक विद्यार्थ्यांबाबत असा प्रकार घडल्याचे समोर आले.
पण, दीड महिन्यानंतर प्रसिद्ध झालेल्या दुसऱ्या यादीत हे विद्यार्थी पास दाखवण्यात आलं आहे. या सगळ्या गोंधळावर लवकरात लवकर तोडगा काढला नाहीतर, अनेक विद्यार्थ्यांना याच फटका बसण्याची शक्यता स्टुडंट लॉ काऊन्सिलने व्यक्त केली आहे.
दरम्यान, विद्यापीठातील अनेक अभ्यासक्रमांच्या परीक्षा होऊन 90 दिवस झाले, तरी अद्याप त्या अभ्यासक्रमांचे निकाल लागलेले नाहीत. त्यामुळे निकाल कधीपर्यंत लागणार की, मागच्या वर्षीसारखा गोंधळ यावर्षी देखील पाहायला मिळणार, असा प्रश्न स्टुडंट लॉ काऊन्सिलकडून विचारला जात आहे.
व्हिडीओ पाहा