मुंबई : मुंबई विद्यापीठ निकालाच्या गोंधळाविरोधात आता प्रहार विद्यार्थी संघटनेने 'फोन लावा' आंदोलन सुरु केलं आहे. मुंबई विद्यापीठाच्या संकेत स्थळावर निकालाबाबत चौकशी करण्यासाठी कॉन्टॅक्ट नंबर दिला नसल्यानं प्रहार संघटनेनं हे आंदोलन सुरू केलंय.
शिक्षणमंत्री विनोद तावडे, कुलगुरू संजय देशमुख, कुलसचिव एम. एम. खान, तसेच परीक्षा नियंत्रक यांचे नंबर प्रहार संघटनेनं फेसबुक, व्हॅट्सअॅपच्या मदतीने व्हायरल केलेत. या सर्वांना फोन करून निकालाचे अपडेट विचारा, असं आवाहन प्रहार संघटनेकडून करण्यात येतंय.
दरम्यान, 31 जुलैची डेडलाईन हुकल्यानंतर, आता 5 ऑगस्टची डेडलाईन पाळण्यात तरी मुंबई विद्यापीठाला यश येणार का असा सवाल विचारला जातोय. कारण संध्याकाळपर्यंत 39 अभ्यासक्रमांचे निकाल लागले असून 255 अभ्यासक्रमांचे निकाल रखडले आहेत.
तसेच काल संध्याकाळपर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार 2 लाख 70 हजार 834 उत्तरपत्रिका तपासायच्या बाकी होत्या. त्यामुळं किमान 5 ऑगस्टपर्यंत तरी निकालाचं काम पूर्ण होणार का असा प्रश्न विद्यार्थ्यांना सतावतोय.
संबंधित बातम्या
मुंबई विद्यापीठाच्या विविध शाखांचे आणखी 39 निकाल जाहीर
मुंबई विद्यापीठाच्या दुसऱ्या डेडलाईनलाही निकाल नाही : कुलगुरु
असा भोंगळ कारभार कधीही पाहिला नव्हता: आदित्य ठाकरे
रखडलेले निकाल 5 ऑगस्टला, मुंबई विद्यापीठाची डेडलाईन
मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुंनी बोलावलेली सिनेटची बैठक रद्द
मुंबई विद्यापीठाच्या विविध शाखांचे 153 निकाल जाहीर
मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुंनी बोलावलेल्या 4 पैकी 3 बैठका रद्द
मुंबई विद्यापीठ निकाल गोंधळ, कुलगुरू संजय देशमुखांच्या गच्छंतीची शक्यता
मुंबई विद्यापीठाचा निकाल 31 जुलैपर्यंत लागणं अशक्य, तावडे तोंडघशी
मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचं 'फोन लगाव, घंटी बजाव' आंदोलन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Aug 2017 11:20 PM (IST)
मुंबई विद्यापीठ निकालाच्या गोंधळाविरोधात आता प्रहार विद्यार्थी संघटनेने 'फोन लावा' आंदोलन सुरु केलं आहे. मुंबई विद्यापीठाच्या संकेत स्थळावर निकालाबाबत चौकशी करण्यासाठी कॉन्टॅक्ट नंबर दिला नसल्यानं प्रहार संघटनेनं हे आंदोलन सुरू केलंय.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -