मुंबई : मुंबई विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांच्या पारंपरिक अभ्यासक्रम म्हणजेच कला, वाणिज्य, विज्ञान यांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सत्र 2 व सत्र 4 (नियमित व बॅकलॉग) परीक्षांसाठी तसेच अभियांत्रिकी, औषधनिर्माण, व्यवस्थापन आदी अभ्यासक्रमांच्या पदव्युत्तर पदवी परीक्षांसाठी मुंबई विद्यापीठ पहिल्यांदाच विद्यार्थ्यांना (Question bank) प्रश्नपेढी उपलब्ध करून देणार आहे.


शिवाय, मागील परिक्षेसाठी ज्या प्रकारे महाविद्यालयाचे क्लस्टर (समूह) तयार करून लीड महाविद्यालयांनी आपल्या स्तरावर विद्यापीठाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार परीक्षा घेण्यात याव्यात, अशा सूचना महाविद्यालयांना केल्या आहेत. सोबतच, परीक्षा संपल्यानंतर 3 दिवसांच्या आत परीक्षांचे गुण ऑनलाइन पद्धतीने विद्यापीठाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात यावे, जेणेकरून विद्यार्थ्यांचा निकाल सुद्धा तातडीने जाहीर केले जातील अशा प्रकारच्या सूचना विद्यापीठाने दिल्या आहेत.


मुंबई विद्यापीठाचा 2021-22 या वर्षाचा 724 कोटींचा वार्षिक अर्थसंकल्प अधिसभेत सादर


याआधी मुंबई विद्यापीठाने उन्हाळी सत्र परीक्षांबाबत एक परिपत्रक 24 मार्च रोजी जाहीर काढले होते. यामध्ये परीक्षा कशा पद्धतीने घेतल्या जाव्यात, पॅटर्न नेमका नेमका कसा असणार व परीक्षा कोणत्या महिन्यात, कालावधीत घेतल्या जाणार याबाबत माहिती जाहीर केली होती. त्या परिपत्रकाचा संदर्भ देत आणखी एक परिपत्रक आज जाहीर केले आहे. कला, वाणिज्य, विज्ञान शाखांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा सत्र 1 आणि सत्र 3 (बॅकलॉग) परीक्षा 25 मे ते 5 जून 2021 या कालावधीत घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


PET EXAM : मुंबई विद्यापीठाच्या पेट प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, याच महिन्यात होणार परीक्षा


व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा या संमिश्र म्हणजे बहुपर्यायी आणि वर्णनात्मक अशा दोन्ही पद्धतीच्या असणार आहेत हे विद्यापीठाकडून या आधीच जाहीर करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे विविध लीड महाविद्यालयांकडून क्लस्टरमधील महाविद्यालयांना या आधी विविध प्रश्नपेढ्या उपलब्ध करून देण्यात येत होत्या. त्याऐवजी आता विद्यापीठाकडूनच प्रश्नपेढी उपलब्ध होणार असल्याने त्यामध्ये समानता येणार आहे.