मुंबई : राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी आणि मुंबईतील महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं हक्काचं विद्यापीठ म्हणजे मुंबई विद्यापीठ (Mumbai university). सध्या नवीन शैक्षणिक वर्षांसाठी विद्यापीठात प्रवेश प्रकियेला सुरुवात झाली आहे. मात्र, याच कालावधीचा गैरफायदा घेत काही समाजकंटकांनी मुंबई विद्यापीठाच्या नावाचा गैरवापर करून एका बनावट फेसबुक पेजद्वारे ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. विद्यार्थ्यांची आर्थिक फसवणूक करण्याच्या उद्देशाने ही फसवणूक करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. या संदर्भात सायबर क्राइम (Cyber crime) विभागाकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानंत, सायबर विभागानेही विद्यार्थ्यांना फसवणुकीपासून सावधान, अलर्ट राहण्याचे आवाहन केले आहे. 

मुंबई विद्यापीठाच्या नावाने सदर बनावट फेसबुक पेज https://www.facebook.com/share/1ALkntvz9o/ या लिंकवर आढळून आले असून, त्यावर इच्छुक विद्यार्थ्यांना त्यांचे नाव, मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी टाकण्यास सांगितले जाते. ही माहिती भरल्यानंतर वापरकर्त्याला https://www.markmonitor.com/online-com/ या संशयास्पद वेबसाईटवर वळवले जाते. या प्रकारातून आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आणि अधिकृत वेबसाईट व माध्यमांद्वारेच माहितीची खात्री करूनच पुढील पाऊल उचलण्याचे आवाहन करण्यात येत आहे. 

मुंबई विद्यापीठ किंवा त्याच्या वतीने कुठल्याही अशा माध्यमातून प्रवेश प्रकिया राबवली जात नाही, याची नोंद घ्यावी. नागरिकांनी अशा बनावट पेजपासून सावध राहावे आणि संशयास्पद माहिती त्वरित संबंधित यंत्रणांकडे कळविण्यात यावी, असे आवाहन मुंबई विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे. त्यामुळे, विद्यार्थ्यांनी व पालकांनी आपली आर्थिक फसवणूक होऊ न देण्यासाठी काळजी घेणं महत्त्वाचं आहे. गेल्या काही दिवसांत ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढले असून सायबर विभागाकडून त्यांच्यावर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

दरम्यान, मुंबई विद्यापीठातील प्रवेश प्रक्रियेची सविस्तर माहिती मुंबई विद्यापीठाच्या www.mu.ac.in या संकेत स्थळावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच, मुंबई विद्यापीठाच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलची देखील माहिती खाली देण्यात आली आहे. 

मुंबई विद्यापीठाचे अधिकृत समाज माध्यम खाती खालील प्रमाणे:  

फेसबुक : //www.facebook.com/share/16NYoF47Qr/?mibextid=wwXIfr

इंस्टाग्राम : @uni_mumbai https://www.instagram.com/invites/contact/?igsh=1waqe9cui2ljn&utm_content=frrdwsd 

एक्स: https://x.com/uni_mumbai?s=21&t=4_dHhl9cp9NER8yj3DA9tQ 

यूट्यूब: https://youtube.com/@universityofmumbai_uom?si=Cn8v_VbmdtbuebSF 

व्हॉट्सअप चॅनेल: https://whatsapp.com/channel/0029Vb1yiOPK0IBi6rHdBw41

हेही वाचा

फाईली मंजूर होईनात, एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे तक्रार; पुण्यातील बैठकीत निशाण्यावर अजित दादा


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI