Mumbai: आधीच महागाईच्या झळा  बसत असताना आता मुंबई महानगरातील प्रवाशांचा प्रवास महागणार आहे. मुंबई महानगर प्रदेशातील मीटर ऑटो रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात 3 रुपयांनी वाढ झाली आहे. तर  कूल कॅबच्या दरात 8 रुपयांनी वाढ झाली आहे. आजपासून (1 फेब्रुवारी 2025) मुंबई महानगर प्रदेशात काळ्या -पिवळ्या टॅक्सी आणि ऑटो-रिक्षाच्या भाड्यात वाढ होणार आहे. मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाने (MMRTA) 23 जानेवारी रोजी वाढत्या वाहनांच्या किमती, ग्राहक निर्देशांक आणि कर्जाचे व्याजदर लक्षात घेऊन भाडेवाढ मंजूर केली होती. (Mumbai Auto Fare Rise)


परिवहन प्राधिकरणाने (MMRTA) मंजूर केलेल्या नवीन दरांनुसार, ऑटोरिक्षाच्या भाड्यात 11 टक्के आणि टॅक्सीच्या भाड्यात 10 टक्क्यांची वाढ झाली आहे. तसेच, निळ्या-सिल्व्हर एसी कूल कॅबच्या भाड्यात तब्बल 20 टक्के वाढ करण्यात आली आहे. सार्वजनिक वाहतुकीवरील अवलंबित्व वाढल्याने नागरिकांना या वाढीव दरांना सामोरे जावे लागणार आहे. मुंबई महानगर प्रदेशातील मीटर ऑटो रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात 3 रुपयांनी वाढ झाली आहे. तर तसेच कूल कॅबच्या दरात 8 रुपयांनी वाढ झाली आहे. (Mumbai Travel Cost)


कितीने होणार वाढ?


नवीन दरांनुसार, ऑटो रिक्षाचे किमान भाडे ₹23 वरून ₹26 करण्यात आले आहे, तर टॅक्सीचे किमान भाडे ₹28 वरून ₹31 करण्यात आले आहे. तसेच, कूल कॅबच्या भाड्यात वाढ होऊन ₹40 ऐवजी ₹48 आकारले जाणार आहेत. प्रति किलोमीटर दरातही वाढ करण्यात आली आहे. टॅक्सीचे नवीन प्रति किलोमीटर भाडे ₹18.66 वरून ₹20.66 करण्यात आले आहे, तर ऑटो रिक्षाचे भाडे ₹15.33 वरून ₹17.14 झाले आहे. कूल कॅबसाठी प्रति किलोमीटर भाडे ₹26.71 वरून ₹37.20 करण्यात आले आहे.


मीटरमध्ये फेरबदल करण्याची मुदत एप्रीलअखेरपर्यंत


नव्या दरानुसार भाडेवाढ करण्यासाठी मीटरमध्ये फेरबदल करण्याची मुदत एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत असून तोपर्यंत सुधारित भाडे आकारणीचा चार्ट देण्यात आला आहे. यानुसार, टॅक्सी आणि ऑटोरिक्षा चालकांना 1 फेब्रुवारी ते 30 एप्रिल 2025 या पुढील तीन महिन्यांत त्यांच्या वाहनांचे मीटर नवीन भाड्याने रिकॅलिब्रेट करून घेणे बंधनकारक असेल. मीटरचे रिकॅलिब्रेट होईपर्यंत, पूर्वीचे भाडे दरपत्रक कार्ड 30 एप्रिलपर्यंत लागू होईल. भाडेवाढ MSRTC द्वारे चालवल्या जाणाऱ्या सर्व मार्गांवर लागू होईल, मुंबईत 15,000 बसचा ताफा आहे. या बसेस दररोज सुमारे 55 लाख प्रवाशांची वाहतूक करतात. मुंबईतील बस नेटवर्क हे भारतातील सर्वात मोठ्या बस नेटवर्कपैकी एक मानले जाते. वाढती महागाई, वाहन देखभाल, इंधन आणि अन्य खर्च लक्षात घेऊन ही दरवाढ करण्यात आली आहे.


हेही वाचा:


Mumbai Water Supply : मुंबईकरांनो लक्ष द्या! तब्बल 30 तास पाणीपुरवठा राहणार बंद; जाणून घ्या तुमच्या विभागात काय स्थिती असणार?