मुंबई :वेगाने धावणाऱ्या मुंबईच्या धावपळीच्या गर्तेत रोज हजारो जीव गाड्यांमध्ये अडकलेले असतात. पण कधी कधी एक सतर्क नजर (Alert Police Officer) आणि क्षणात घेतलेला निर्णय (Quick Response) आयुष्य आणि मृत्यूमधली रेषा पुसून टाकतो. मुंबई वाहतूक पोलीस दलातील (Mumbai Traffic Police) महिला पोलीस कॉन्स्टेबल दिपाली मंडाले (Dipali Mandale) यांच्या प्रसंगावधानामुळे असाच एक अमूल्य जीव वाचला आहे.
वडाळा वाहतूक विभागात कार्यरत असलेल्या दिपाली मंडाले या वडाळा जंक्शन (Wadala Junction) परिसरात चेंबूरहून अँटॉप हिलकडे जाणारी वाहतूक नियंत्रणात ठेवत होत्या. याचवेळी आकाशवाणीच्या वाहनावरील चालकाला अचानक छातीत तीव्र वेदना (Chest Pain) जाणवू लागल्या. चालक वारंवार हातवारे करत होता, मात्र सुरुवातीला कोणतीही प्रतिक्रिया मिळत नव्हती.
क्षणाचाही विलंब न करता धाडसी पाऊल (Quick Action by Woman Police)
दिपाली यांनी परिस्थितीची गंभीरता ओळखत तात्काळ वाहनाकडे धाव घेतली. चालकाला गाडीतून बाहेर काढताच त्याला हृदयविकाराचा झटका (Heart Attack) येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यावेळी दिपाली यांनी तातडीने चालकाला CPR देत जीव वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला.
रुग्णालयात वेळेत दाखल (CPR Saved Life)
प्राथमिक उपचारानंतर चालकाला तातडीने जवळील गॅलक्सी रुग्णालयात (Galaxy Hospital) दाखल करण्यात आले. वेळेत मिळालेल्या उपचारांमुळे चालकाची प्रकृती सध्या स्थिर असून, डॉक्टरांनीही वेळेवर दिलेल्या CPR मुळे प्राण वाचल्याचे स्पष्ट केले.
कर्तव्यनिष्ठेला सलाम, वरिष्ठांकडून कौतुक (Mumbai Police Appreciation)
दिपाली मंडाले यांच्या या सेवाभावी आणि धाडसी कृतीची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचताच सर्व स्तरातून त्यांचे कौतुक करण्यात आले. वाहतूक पोलीस सहआयुक्तांना पत्र लिहून दिपाली यांच्या कर्तव्यनिष्ठेची विशेष दखल घेण्याची शिफारस करण्यात आली आहे. सध्या दिपाली यांच्यावर सर्वत्र कौतुकांचा वर्षाव होत आहे.
खाकी वर्दी म्हणजे फक्त कायदा अंमलबजावणी नाही, तर संकटाच्या क्षणी माणुसकीचा आधार असतो हे दिपाली मंडाले यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले. एका क्षणाच्या प्रसंगावधानाने एखाद्याचं आयुष्य वाचू शकतं, याचं हे जिवंत उदाहरण आहे.
ही बातमी वाचा:
