मुंबई : गुंडांच्या इनकमिंगवरुन भाजपवर जोरदार टीका करणाऱ्या शिवसेनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील प्रभादेवीच्या प्रचारसभेत चोख प्रत्युत्तर दिलं आहे. 'गिरेबान में झाक के देखो,' असा टोला लगावत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेमधील गुन्हेगार उमेदवारांची आकडेवारी जाहीर केली.

मुंबईत शिवसेनेने सर्वाधिक गुन्हेगारांना तिकीट दिलं. शिवसेनेचे 63 उमेदवार गुन्हेगार असून, 43 जणांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहे. त्यामुळे एकदा आरशासमोर उभे राहा...गिरेबान में झाक के देखो, असा सणसणीत टोला मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला लगावला.

काही दिवसात कुख्यात डॉन दाऊदही भाजपमध्ये दिसेल असा उपहासात्मक टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्याला आज मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं आहे.

महापालिका तुमची खासगी मालमत्ता नाही. ती मुंबईकरांची आहे आणि मुंबईला मालक नको सेवक हवे आहेत असं मुख्यमंत्री म्हणाले. त्यामुळे आम्ही विकासाच्या मुद्द्यावर मत मागत आहोत. महापालिकेत एक हाती सत्ता तुम्ही द्याल आणि संसदेपासून महापालिकेपर्यंत एक पक्षीय सत्ता येईल, असा मला विश्वास असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

विकासाच्या मुद्द्यावर मत मागत आहोत. महापालिकेत एक हाती सत्ता तुम्ही द्याल, संसदेपासून महापालिकेपर्यंत एक पक्षीय सत्ता

कोस्टल रोडवर उद्धव ठाकरे इतकी वर्ष प्रेझेन्टेशन दाखवतात, पण मी ते न करता मेट्रोचं काम वेगाने सुरु केलं

तुमचं व्हिजन काय आमचं व्हिजन काय, यावर चर्चा करुया. पण शिवसेना चर्चा करायला तयार नाही

63 गुन्हे असलेले उमेदवार आहेत. 43 उमेदवारांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे

या मुंबईत सर्वाधिक गुन्हेगारांना तिकीट शिवसेनेने दिले. एकदा आरशासमोर उभं राहून बघा...गिरेबान मे झाक के देखो

ते म्हणाले आमच्या पक्षात गुन्हेगार आहे. पण सगळ्यात जास्त 63 उमेदवार गुन्हेगार शिवसेना पक्षाने दिले आहेत

महापालिका तुमची खासगी मालमत्ता नाही, ती मुंबईकरांची आहे, मुंबईला मालक नको सेवक हवे

मराठी मुलांकडून 70 हजार डिपॉझिट घेऊन शिव वडापाव गाडी दिली, पैसे गेले कुठे माहित नाही

महापालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रीय प्रश्नांवर चर्चा का?, इथे काही केलंच नाही तर सांगणार काय?