मुंबई : मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात मंगळवारी रात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. मुंबईत गेल्या काही वर्षातील जुलै महिन्यातील विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साठलं होतं. नागरिकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव सरकारने सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली.


मात्र सोमवारी रात्रीपासूनच नागरिकांना पावसामुळे मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलं. पावसामुळे रेल्वे, रस्ते आणि हवाई वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वे वाहतूक सकाळपासून विस्कळीत झाली आहे.

यावेळी नागरिकांना मुंबईच्या पावसाची स्थिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. काहींनी तुंबलेल्या पाण्याचं वास्तव सोशल मीडियावर शेअर केलं, तर काहीजण पावसाच्या साठलेल्या पाण्यावरही गमतीशीर पद्धतीने व्यक्त झाले आहे.

एका युजरने मरोळ नाका येथील साचलेल्या पाण्याचा व्हिडीओ शेअर केला. मरोळ नाका जुहू बीच झाल्याचं कॅप्शन त्याने व्हिडीओला दिलं आहे.


साकिनाका पोलीस स्टेशनमध्ये गुडघाभर पाणी साचलं होतं. त्या परिस्थितीतही कर्मचारी आपलं काम करत होते.






एकाने लिहिलं की, मी होडीची वाट पाहत होतो आणि ट्रेन आली.