पुणे : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडी कायम असून 30 तासांहून अधिक वेळ झाला तरी ती सुटली नाही. त्यामुळे पुणे पोलिसांनी आता ट्रॅफिक अॅडव्हायझरी जारी केली आहे. किवळे येथून एक्सप्रेस हायवे वरील वाहतूक जुन्या पुणे मुंबई हायवेने वळविण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली आहे. तसेच गॅसचा टँकर काढण्याचे काम प्रगतीपथावर असून पुढील काही तासातच वाहतूक पूर्वपदावर येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. त्याचवेळी, आवश्यकता असेल तरच पुणे मुंबईचा प्रवास करा असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.

Continues below advertisement

मंगळवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ ज्वलनशील गॅसचा टँकर पलटी झाला. त्यामुळे या महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचं दिसून आलं. या घटनेसंबंधी प्रशासनाने कोणताही खबरदारीच्या सूचना दिल्याने ही कोंडी झाल्याचं सांगितलं जातंय. त्याचा फटका बुधवारी पहाटे मुंबईच्या दिशेने निघालेल्या प्रवाशांना झाला आणि दिवसभर त्यांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला. 

Mumbai Pune Expressway Traffic Update : गैरसोय टाळा पोलिसांचे आवाहन

त्यानंतर आता पुणे वाहतूक पोलिसांनी एक ट्रॅफिक अॅडव्हायझरी जारी केली आहे. पलटी झालेला टँकर बाजूला काढण्याचं काम जलदगतीने सुरू असून काही तासात हा मार्ग पूर्ववत होईल असं पोलिसांनी म्हटलं आहे. प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी आवश्यकता असेल तरच पुणे मुंबई प्रवास करावा असं आवाहन पोलिसांनी केलं. महामार्गावरील गर्दीचे प्रमाण पाहून प्रवासाचे नियोजन करावे, असं आवाहनही पोलिसांनी केलं.

Continues below advertisement

Mumbai Pune Expressway News : शिंदेंकडून गंभीर दखल

दरम्यान, मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील वाहतूक कोंडीची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गंभीर दखल घेतली आहे. आपत्कालीन परिस्थितीतील वाहतूक आराखडा तात्काळ तयार करण्याच्या सूचना शिंदेंनी दिल्या आहेत. सोबतच मिसिंग लिंकचे कामही लवकर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.

Mumbai Pune Highway Traffic : 30 तासांहून अधिक काळ प्रवाशांचं हाल

तब्बल 30 तास उलटले तरी, मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतुकीची कोंडी अद्यापही फुटलेली नाही. मंगळवारी संध्याकाळी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास, आडोशी बोगद्याजवळ ज्वलनशील, प्रोपलीन गॅसची वाहतूक करणारा टँकर उलटला आणि मुंबईकडे जाणारी वाहतूक तात्काळ ठप्प झाली.

एकीकडे वाहनांच्या तुडुंब रांगा लागलेल्या असताना, प्रवाशांच्या होणाऱ्या हालअपेष्टांकडे दुर्लक्ष करत, टोल वसूलीची धाड मात्र सुरूच असल्याची तक्रार प्रवाशांनी केली. या कोंडीत अडकलेल्या प्रवाशांना मात्र कोणीच वाली उरलेला नाही. टोल घेणारे आणि प्रशासन चालवणाऱ्यांनी प्रवाशांना वाऱ्यावर सोडल्याचं चित्र आहे.

दरम्यान, वाहतूक पूर्ववत होण्यासाठी अजून काही तास लागणार असल्याची माहिती आहे. आता आडोशी बोगड्याजवळ उपलब्ध असलेल्या टँकरमध्ये सर्व गॅस रिफिल होण्याची क्षमता आहे अशी माहिती महामार्ग पोलिसांनी दिली. त्यामुळं रात्री बारा पर्यंत मुंबईकडे जाणारा मार्ग खुला होईल असं महामार्ग पोलिसांनी सांगितलं.

ही बातमी वाचा: