Mumbai-Pune Expressway Missing Link project: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज (12 जुलै) मिसिंग लिंक प्रकल्पाची (Mumbai-Pune Expressway Missing Link project) पाहणी केली. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील खोपोली एक्झिट ते कुसगाव या भागात मिसिंग लिंक प्रकल्प उभारण्यात आला आहे.
मिसिंग लिंक प्रकल्पामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ट्रॅफिक कमी होणार आहे. मिसिंग लिंकमुळे दोन महत्वाचे फायदे होणार आहे. यामध्ये पहिलं म्हणजे 6 किमीचं अंतर कमी होणार आहे. तर दूसरे म्हणजे मुंबई-पुणे प्रवासासाठी अर्धा तास कमी लागणार आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मिसिंग लिंक प्रकल्प ऑक्टोबरपर्यंत 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश-
मिसिंग लिंक (Mumbai-Pune Expressway Missing Link project) जगातला सगळ्यात रुंद बोगदा आहे. हा मार्ग लोणावळा लेकच्या खाली हजार फूट असणार आहे. जगातला सर्वात अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरुन हा मिसिंग लिंक तयार केला आहे. यामुळे नेहमीच्या वेळापेक्षा मुंबई-पुणे प्रवासासाठी अर्धा तास कमी लागणार आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे पर्यायी रस्ता (मिसिंग लिंक) लवकरच तयार होणार आहे. हा प्रकल्प 2019 मध्ये सुरू करण्यात आला असून अनेकदा त्याला मुदतवाढ देण्यात आली आहे. आता ऑक्टोबरपर्यंत 2025 पर्यंत मुंबई-पुणे एक्सप्रेस वे मिसिंग लिंक प्रकल्प पूर्ण करण्याचे आदेश दिल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
कसा आहे मीसिंग लिंक प्रकल्प ?
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील मिसिंग लिंक प्रकल्पामुळे 6 किलोमीटरने अंतर कमी होणार आहे. या मिसिंग प्रकल्पामध्ये खोपोली एक्झिटपासून लोणावळ्यापर्यंत दोन्ही दिशेने 4 मार्गिकांसाठीचे दोन बोगदे उभारण्यात आले आहे. यातील पहिला बोगदा 8.92 किमी, तर दुसरा बोगदा 1.75 किमीचा आहे. तर या बोगद्याला जोडणारा आणि टागर व्हॅलीवर बांधला जाणारा केबल-स्टेड पूल जमिनीपासून सुमारे 132 फूट उंचीवर आहे.
मिसिंग लिंक कसा जोडला जाईल?
- खोपोली येथून मिसिंग लिंक रस्ता सुरु होईल.
- लोणावळा-खंडाळा विभागात टायगर व्हॅलीपासून 132 मीटर उंचीवर असलेला 640 मीटर लांबीचा केबल-स्टेड पूल
- पहिला बोगदा 8.92 किमी
- दुसरा बोगदा- 1.75 किमी