Mumbai Police : दरम्यान, मुंबई पोलिसांनी कुणाल कामरा यांच्या स्टँड-अप कॉमेडी 'नया भारत' शोला उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना समन्स बजावले आहेत. या प्रकरणी भारतीय पोलिस सेवेतील माजी अधिकारी आणि आता वकील असलेले वाय.पी. सिंग यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना माहिती दिली आहे. इलेक्ट्रॉनिक पुरावे उपलब्ध असल्याने या प्रकरणात प्रेक्षकांना बोलावणे बंधनकारक नाही. या आधी कुणाल कामरा प्रकरणात जिथे हा संपूर्ण शो करण्यात आला, त्या हेबीटेट स्टूडिओची चौकशी करण्यात आलेली आहे. कुणाल कामराला आतापर्यंत चौकशीला येण्याचे तीन समन्स देण्यात आलेले आहेत, तर “गेल्या 10 वर्षांपासून मी जिथे राहत नाही अशा पत्त्यावर जाणे म्हणजे तुमचा वेळ आणि सार्वजनिक संसाधनांचा अपव्यय आहे.” अशी पोस्ट कामराने केली आहे.
दुसरा समन्स बजावण्यात आल्यानंतरही कुणाल कामरा जबाब नोंदवण्यासाठी आलेला नाही. पोलिसांचं एक पथक कामराच्या मुंबईतील घरी दाखल झालंय. कुणाल का येत नाही? आणि तो कधी येणार? हे जाणून घेण्याचा पोलिसांकडून प्रयत्न सुरु आहे. दरम्यान, कुणालबाबत कोणतीही माहिती असल्याचं कामराच्या कुटुंबियांनी सांगितलंय. माहितीनुसार, चार्जशिट दाखल करण्याआधी सर्व सविस्तर प्रकरणाची बाजू तपासण्यासाठी आणि प्रत्यक्षदर्शी यांचा जबाब त्यात असण्याच्या अनुषंगाने हे समन्स देण्यात आले आहेत.
दोन आठवड्यांपूर्वी कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या व्यंगात्मक गाणं गात टीका केली होती. त्यानंतर संतापलेल्या शिंदेंच्या शिवसैनिकांनी स्टुडिओची तोडफोड केली होती. त्यानंतर कुणाल कामराला मद्रास हायकोर्टाने अटकपूर्व जामीन देखील मंजूर केलाय. दरम्यान, कुणाल कामराच्या घरी जाऊन मुंबई पोलीसांनी चौकशी केली आहे. दुस-या समन्सची मुदत संपत आली, तरी कुणाल कामरा खार पोलीस ठाण्यात चौकशीसाठी अद्याप हजर झालेला नाही. "तो का आला नाही?", याची चौकशी करण्याकरता पोलीसांचं एक पथक माहिम येथील कामराच्या घरी गेलं होतं. त्याच्या घरच्यांनी तो घरी नसल्याचं कळवल्यानं पोलीस लगेच आल्या पावली परत गेले.
इतर महत्त्वाच्या बातम्या
