मुंबई : ही कहाणी आहे मुंबईतील एका जिगरबाज पोलीस कर्मचाऱ्याची. प्रसाद हा मुंबई पोलिसात पोलीस शिपाई आहे. तीन वर्षांपूर्वी प्रसाद यांचे वर्षाशी लग्न झाले. सध्या पोलिसांवर ताण आहे. प्रसाद मागील दोन महिन्यांपासून कोरोना बाधित असलेल्या रुग्णालयाचा बंदोबस्तात काम करत आहे. कामावर असताना घरी जाणं टाळणारा प्रसाद बायको आजारी पडल्याने घरी गेला अन् नंतर दोघांच्या कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले.
या दोघांनाही मुंबईच्या एका रुग्णालयात एकाच वार्डात ठेवण्यात आले आहे. घरी केवळ दीड वर्षाचा मुलगा आणि आई असून त्या दोघांची ही चाचणी करण्यात आली असून त्यांचे रिपोर्ट येणे अद्याप बाकी आहे. अशा परिस्थितीतही या दाम्पत्याने आज आपला लग्नाचा तिसरा वाढदिवस रुग्णालयातच साजरा करुन एकमेकांना धीर दिला. बायकोला देण्यासाठी या पोलीस कर्मचाऱ्या जवळ आज कोणतीही वस्तू नाही. तिलाही आपल्या नवऱ्यासाठी छानसे गिफ्ट द्यायचे होते. त्याची तयारीही तिने मागच्या पंधरा दिवसापासून केली होती. मात्र, हॉस्पिटलमध्ये यावे लागले आणि दोघांचेही बेत रद्द झाले.
आनंदाची बातमी! जे. जे. पोलीस ठाण्यातील 45 पैकी 18 कर्मचारी कोरोनावर मात करुन कर्तव्यावर हजर
एकीकडे दीड वर्षाच्या मुलाची आईला काळजी
तरी मागील तीन दिवसांपासून हे दोघेजण अतिशय सकारात्मकरित्या या आजाराशी लढा देत आहेत. पुन्हा ड्युटीवर जॉईन व्हायचे आहे, कामही मेरा धर्म हे असे म्हणत हा पोलीस कर्मचारी फोनवर बोलताना आपल्या मित्रांनाही करोना से क्या डरना असा धीर देत आहे. आज लोकांना सुरक्षित करताना पोलिसांना आणि त्यांच्या कुटुंबियांना किती धोका आहे आणि तरीही ते कसे एकत्र कोरोनाच्या संकटाला तोंड देत आहेत याचेच हे उदाहरण आहे.
पोलिसांना 50 लाखांचं कवच
कोरोना संकटकाळात महाराष्ट्र पोलिसांना 50 लाखांचे कवच मिळणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे. राज्यातील पोलीस दल कोरोनाविरुद्धच्या लढाईत जोखीम पत्करुन योगदान देत आहे. कर्तव्य बजावताना पोलीस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे दुर्दैवाने मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपये सानुग्रह अनुदान देणार, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
#Corona Patients | मुंबईत कोरोना रुग्णांसाठी 10 हजार बेड बनवण्याचं काम सुरू - पालकमंत्री अस्लम शेख