एक्स्प्लोर

Mumbai News Water Cut: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, मंगळवारी 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार

Mumbai News Water Cut: मुंबईकरांना येत्या मंगळवारी पाणी टंचाईचा सामना करावा लागेल. मुंबईच्या काही भागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद असेल. पालिकेकडून नागरिकांना अलर्ट

Mumbai News Water Cut: मुंबईत येत्या मंगळवारी काही भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने (BMC) नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे. मुंबईच्या अनेक भागांमध्ये मंगळवारी एकतर पाणीपुरवठा (Water Supply) पूर्णपणे बंद राहील अथवा पाणी कमी दाबाने येईल. त्यादृष्टीने नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. (Mumbai Latest news)

बृहन्मुंबई महानगरपालिकेने वांद्रे पश्चिम येथील 900 मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीवरील गळती दुरुस्तीचे अत्यावश्यक काम हाती घेतले आहे. त्यामुळे मंगळवार, 10 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत तब्बल 14 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. काही भागांत पाणीपुरवठा पूर्णतः खंडित राहील, तर काही ठिकाणी कमी दाबाने पाणी मिळणार आहे.

पाली हिल जलाशयाच्या 900 मि.मी. आवक (इनलेट) जलवाहिनीवर गळती आढळून आली. त्यामुळे ती दुरुस्ती करणं आवश्यक असल्याने हे काम वांद्रे पश्चिमेतील कुरेशी नगर झोपडपट्टीजवळील एमएचएडीएच्या मोकळ्या भूखंडातून तसेच पश्चिम द्रुतगती महामार्गालगत जाणाऱ्या जलवाहिनीवर करण्यात येईल. या दुरुस्तीमुळे एच-पश्चिम विभागातील मोठ्या परिसरावर पाणी पुरवठ्याचा परिणाम होणार आहे.

Mumbai news: मुंबईच्या कोणत्या भागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार?

वांद्रे पश्चिमेकडील हिल रोड, पाली हिल, कार्टर रोड, सेंट अँड्र्यूज मार्ग, पाली गाव, चिंबई, शेर्ली गाव, कांतवाडी तसेच खार दांडा, कोळीवाडा, दांडा पाडा, चुईम गावठाण, खार पश्चिमेतील काही भागात , माउंट मेरी परिसर, के.सी. मार्ग, बाजार रस्ता, पाली माला, कोल डोंगरी, नर्गिस दत्त मार्ग पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. हिल रोडच्या टोकापासून ताज लँड्स एन्ड, बी. जे. मार्ग, एच.के. भाभा मार्ग, काणे मार्ग आणि गणेश झोपडपट्टी परिसरात मध्यरात्रीनंतर 1 ते पहाटे 4.30 या वेळेत कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आली आहे.

Mumbai Fire news: चुनाभट्टीत बर्गरच्या दुकानात सिलेंडरचा स्फोट

मुंबईतील सायन चुनाभट्टी परिसरात असणाऱ्या एका बर्गर जॉईंटच्या दुकानाला शनिवारी मध्यरात्री भीषण आग लागली. हे दुकान सायन-पनवेल महामार्गाला लागून आहे. या दुकानातील गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. या आगीत मोठी वित्तहानी झाली आहे, पण सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सायन हायवे येथील खाजगी टूर्स आणि ट्रॅव्हल च्या बसचा थांबा असलेल्या ठिकाणी ही घटना घडली. रात्री घटनास्थळी अग्निशामक दल आणि पोलीस प्रशासन पोहोचले होते आणि आग विझविण्यासाठी तब्बल दोन तास लागले.

आणखी वाचा

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, 88 लोकल गाड्यांना 3 महिन्यांचा ब्रेक; प्रवाशांना नेमका काय फटका बसणार?

About the author अजय माने

अजय माने
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Blog Updates: धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या अर्चना पाटलांचा विजय 
Maharashtra Live Blog Updates: धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या अर्चना पाटलांचा विजय 
Maharashtra Goverment On LPG Cylinder Shortage: सिलिंडर नेणाऱ्या वाहनांना पोलिसांनी सुरक्षा द्यावी, कंट्रोल रुम बनवा...; राज्य सरकारच्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना
सिलिंडर नेणाऱ्या वाहनांना पोलिसांनी सुरक्षा द्यावी, कंट्रोल रुम बनवा...; राज्य सरकारच्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना
Stuti Sonawane Death Case Mumbai: अलिबागची ट्रिप, आंबट कँडी आणि छोटा बाथटब...; आयुष्य संपवण्याआधी मुंबईकर स्तुती काय काय म्हणाली?
अलिबागची ट्रिप, आंबट कँडी आणि छोटा बाथटब...; आयुष्य संपवण्याआधी मुंबईकर स्तुती काय काय म्हणाली?
पायी परिक्रमा करत असलेल्या जैन मुनींचा अपघातात मृत्यू, मुंबई-अहमदाबाद महामार्गावर घडली घटना
पायी परिक्रमा करत असलेल्या जैन मुनींचा अपघातात मृत्यू, मुंबई-अहमदाबाद महामार्गावर घडली घटना
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report
Pune Drugs : पुण्यात ड्रग्जची टपरी, कासेवाडी परिसरात अवैध धंदे Special Report
Russia Oil : इराणवर हल्ले, रशियाचं बल्ले बल्ले, चढ्या दरानं तेल घ्यावं लागणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Crime: जयराम चाटे तुरुंगातून बाहेर पडण्यापूर्वी गँगचा राडा , बीडमध्ये तरुणावर लोखंडी रॉड, कत्तीने हल्ला
जयराम चाटे तुरुंगातून बाहेर पडण्यापूर्वी गँगचा राडा , बीडमध्ये तरुणावर लोखंडी रॉड, कत्तीने हल्ला
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...
Paper Leak Case : दहावीच्या पेपरफुटी प्रकरणाला नवं वळण, पेपर फुटलाच नाही, नर्सिंगचा विद्यार्थी 600 रुपये उकळायचा, पोलीस तपासात सत्य समोर
दहावीच्या पेपरफुटी प्रकरणाला नवं वळण, पेपर फुटलाच नाही, पोलीस तपासात वेगळाच अँगल समोर
US Iran War : अमेरिका- इराण युद्ध सुरु झाल्यापासून शेअर बाजारात 33 लाख कोटी बुडाले, गुंतवणूकदारांचं 6 वर्षातील सर्वात मोठं नुकसान
अमेरिका- इराण युद्ध सुरु झाल्यापासून शेअर बाजारात 33 लाख कोटी बुडाले, गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान
Hormuz Strait  Crisis: भारतासाठी होर्मुझ सामुद्रधुनी खुली होण्याचे संकेत, भारत जुना मित्र असल्याचा इराणचा दावा
भारतासाठी होर्मुझ सामुद्रधुनी खुली होण्याचे संकेत, भारत जुना मित्र असल्याचा इराणचा दावा
Ratnagiri Crime : अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; कृत्य करून व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या दोघांना अटक
अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; कृत्य करून व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या दोघांना अटक
Home Loan: स्वत:चं घर खरेदी करण्याचं स्वप्न पाहताय, गृहकर्जाचा सर्वात कमी व्याज दर कोणत्या बँकेचा? जाणून घ्या यादी
Home Loan: स्वत:चं घर खरेदीचं स्वप्न पाहताय, गृहकर्जाचा सर्वात कमी व्याज दर कोणत्या बँकेचा?  
इकडं कुवेतनंतर इराकमध्ये हवेत इंधन भरणारं अमेरिकन हवाई दलाचं विमान कोसळलं; चार क्रू मेंबर्सचा मृत्यू, 2 बेपत्ता; तिकडं ट्रम्पकडून इराण सुप्रीम लीडरांविरोधात भलताच दावा
इकडं कुवेतनंतर इराकमध्ये हवेत इंधन भरणारं अमेरिकन हवाई दलाचं विमान कोसळलं; चार क्रू मेंबर्सचा मृत्यू, 2 बेपत्ता; तिकडं ट्रम्पकडून इराण सुप्रीम लीडरांविरोधात भलताच दावा
Embed widget