एक्स्प्लोर

Mumbai News: मुंबईच्या रस्त्यावर पायी चालत असाल तर सावधान! वायरचा शॉक लागून जीव जाण्याची शक्यता, नेमकं प्रकरण काय?

Mumbai News: स्पार्क सुरू असतानाही त्याच ठिकाणाहून वाहनांची वर्दळ सुरू होती आणि अनेक नागरिक जीव धोक्यात घालून पायी जात होते.

मुंबईच्या रस्त्यांवर पायी चालणाऱ्या नागरिकांसाठी धोक्याची घंटा ठरावी अशी धक्कादायक घटना दहिसर परिसरात उघडकीस आली आहे. दहिसर येथील एस. व्ही. रोडवर रस्त्याच्या मधोमध पडलेल्या उघड्या (Mumbai News) केबलमधून करंटचे स्पार्क होत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.(Mumbai News)

केबलमधून वारंवार ठिणग्या उडताना स्पष्टपणे दिसते

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सिमेंट-काँक्रीटच्या रस्त्यावर एक केबल पडलेली दिसत आहे. त्या केबलमधून वारंवार ठिणग्या उडताना स्पष्टपणे दिसते. विशेष म्हणजे, स्पार्क सुरू असतानाही त्याच ठिकाणाहून वाहनांची वर्दळ सुरू होती आणि अनेक नागरिक जीव धोक्यात घालून पायी जात होते. एखाद्याला शॉक लागून गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.(Mumbai News)

सुदैवाने या प्रकारात कोणतीही जीवितहानी झाली नाही

ही घटना सुमारे सात ते आठ दिवसांपूर्वीची असून दहिसर एस. व्ही. रोडवरील रवींद्र हॉटेलसमोरील परिसरात घडल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने या प्रकारात कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र या घटनेमुळे शहरातील पादचारी सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.(Mumbai News)

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी संबंधित पालिका प्रशासन, रस्त्याचे काम करणारा कंत्राटदार तसेच संबंधित वीज वितरण कंपनीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे. रस्त्यावर उघडी केबल कशी राहिली, सुरक्षेची उपाययोजना का करण्यात आली नाही, याबाबत जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी होत आहे.(Mumbai News)

दरम्यान, व्हायरल व्हिडिओची दखल घेत दहिसर पोलिसांनीही या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. संबंधित केबल रस्त्यावर कशी आली, ती कोणाच्या अखत्यारीत होती आणि स्पार्क होण्यामागील नेमके कारण काय, याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. शहरातील वाढत्या पायाभूत कामांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या उपाययोजना काटेकोरपणे राबविण्याची गरज या घटनेमुळे अधोरेखित झाली आहे.(Mumbai News)

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vasai Crime News: चार जण दुचाकीवरून आले; वाहतूक पोलिसांनी अडवताच राग, हुज्जत घातली अन् दगडाने अधिकाऱ्यावर केला हल्ला करत डोकं ठेचलं, वसईतील धक्कादायक घटना
चार जण दुचाकीवरून आले; वाहतूक पोलिसांनी अडवताच राग, हुज्जत घातली अन् दगडाने अधिकाऱ्यावर केला हल्ला करत डोकं ठेचलं, वसईतील धक्कादायक घटना
BMC : मोठी बातमी : आक्रमक पवित्र्यानंतर मनसेच्या अटी ठाकरे सेनेकडून मान्य,  संजय राऊत-राज ठाकरेंच्या भेटीनंतर मोठ्या घडामोडी
आक्रमक पवित्र्यानंतर मनसेच्या अटी ठाकरे सेनेकडून मान्य,  संजय राऊत-राज ठाकरेंच्या भेटीनंतर मोठ्या घडामोडी
Maharashtra Budget Session 2026: विमान डाव्या नव्हे उजव्या बाजूला झुकलं; रोहित पवारांकडून व्हिडीओ दाखवून DGCA च्या अहवालाची चिरफाड
Maharashtra Budget Session 2026: विमान डाव्या नव्हे उजव्या बाजूला झुकलं; रोहित पवारांकडून व्हिडीओ दाखवून DGCA च्या अहवालाची चिरफाड
Sachin Kalyanshetti vs Bhaskar Jadhav : तुम्ही बाप का काढला, भाजप आमदार भास्कर जाधवांना भिडला, विधीमंडळ परिसरात आमदारांची बाचाबाची!
तुम्ही बाप का काढला, भाजप आमदार भास्कर जाधवांना भिडला, विधीमंडळ परिसरात आमदारांची बाचाबाची!
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Jayant Patil on NCP Merger : विलिनीकरणाची चर्चा थांबली, ज्यांच्याशी चर्चा केली ते दादाच नाहीत
Sanjay Raut Mumbai PC : जे काय होईल ते एकमतानेच होईल सातवी जागा मविआ म्हणूनच जिंकू
Raj Thackeray MNS On BMC Ward Committees Election:उद्धव ठाकरेंच्या त्या निर्णयामुळे राज ठाकरे नाराज?
Rajyasabha Election : शरद पवारांना उमेदवारी न दिल्यास भाजप मोठा निर्णय घेणार
Iran–Israel Conflict : इराण इस्त्रायल युद्धाच्या सर्व बातम्या एका क्लिकवर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तहसिलदार मॅडम पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या! 'तो' व्हिडिओ व्हायरल होताच मुख्य सचिवांकडून थेट चौकशीचे आदेश
तहसिलदार मॅडम पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या! 'तो' व्हिडिओ व्हायरल होताच मुख्य सचिवांकडून थेट चौकशीचे आदेश
Ayatollah Ali Khamenei: इस्त्रायलनं कधीकाळी खिशातील पेजर हॅक करून स्फोट घडवल्यानंतर CIA च्या मदतीनं कार्यालयात ये-जा करणाऱ्या अयातुल्ला अली खोमेनींचा माग कसा काढला?
इस्त्रायलनं कधीकाळी खिशातील पेजर हॅक करून स्फोट घडवल्यानंतर CIA च्या मदतीनं कार्यालयात ये-जा करणाऱ्या अयातुल्ला अली खोमेनींचा माग कसा काढला?
Vasai Crime News: चार जण दुचाकीवरून आले; वाहतूक पोलिसांनी अडवताच राग, हुज्जत घातली अन् दगडाने अधिकाऱ्यावर केला हल्ला करत डोकं ठेचलं, वसईतील धक्कादायक घटना
चार जण दुचाकीवरून आले; वाहतूक पोलिसांनी अडवताच राग, हुज्जत घातली अन् दगडाने अधिकाऱ्यावर केला हल्ला करत डोकं ठेचलं, वसईतील धक्कादायक घटना
चोरीचा आरोपात पोलिसांकडून जबर मारहाण, मुलीने संपवले जीवन; आई-वडिलांचा टाहो, पोलीसात धाव
चोरीचा आरोपात पोलिसांकडून जबर मारहाण, मुलीने संपवले जीवन; आई-वडिलांचा टाहो, पोलीसात धाव
Iran : अमेरिका-इस्त्रायल विरुद्ध इराण किती दिवस लढू शकतो? इराणकडे किती शस्त्रसाठा? जाणून घ्या
अमेरिका-इस्त्रायल विरुद्ध इराण किती दिवस लढू शकतो? इराणकडे किती शस्त्रसाठा? जाणून घ्या
अमेरिका अन् आखाती देशातील युद्धाचा थेट लातूरवर परिणाम; शेकडो टन माल अडकला, कोट्यावधींची उलाढाल ठप्प
अमेरिका अन् आखाती देशातील युद्धाचा थेट लातूरवर परिणाम; शेकडो टन माल अडकला, कोट्यावधींची उलाढाल ठप्प
सन 2024 सालाच्या तुलनेत 2025 साली राज्यात बेपत्ता महिला व अल्पवयीन मुलींची संख्या अधिक; राज्य सरकारच्याच आकडेवारीतून धक्कादायक वास्तव
सन 2024 सालाच्या तुलनेत 2025 साली राज्यात बेपत्ता महिला व अल्पवयीन मुलींची संख्या अधिक; राज्य सरकारच्याच आकडेवारीतून धक्कादायक वास्तव
Jayant Patil on NCP Merger : राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचं पुढे काय? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, 'ते नेते आता....'
राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचं पुढे काय? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, 'ते नेते आता....'
Embed widget