Mumbai News: मुंबईच्या एका सोसायटीत 7 वर्षांच्या मुलावर चढवली कार, पाय चिरडला; संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
Mumbai News: मालाडमधील इंटरफेस हाइट्स सोसायटीत एका सात वर्षांच्या मुलावर कार चढल्याने तो गंभीर जखमी झाला आहे.

Mumbai News मुंबई: मालाडमधील इंटरफेस हाइट्स सोसायटीत एका सात वर्षांच्या मुलावर कार चढल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. ही धक्कादायक घटना 19 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली असून, संपूर्ण प्रकार सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगा इतर मित्रांसोबत सोसायटीच्या आवारात खेळत असताना श्वेता शेट्टी राठोड यांच्या कारने वळण घेताना मुलाच्या पायावर चाक गेले. या अपघातात त्याचा पाय गंभीररीत्या चिरडला गेला आहे. घटनेनंतर तातडीने त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे.



















