Dangerous Buildings List in Mumbai: पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांसाठी महत्त्वाचा इशारा देत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण (MHADA) ने मुंबई शहर विभागातील 82 इमारतींना "अतिधोकादायक" घोषित केले आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी या इमारतींमधील रहिवाशांनी तातडीने स्थलांतर करावे, असे आवाहन म्हाडाकडून करण्यात आले आहे.
MHADAच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने केलेल्या सर्वेक्षणात या इमारती धोकादायक असल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे, यापैकी 43 इमारतींना गेल्या वर्षीही धोकादायक घोषित करण्यात आले होते. त्यामुळे जुन्या आणि जीर्ण सेस इमारतींच्या पुनर्विकास व दुरुस्तीचा प्रश्न अद्यापही कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. या 82 इमारतींमध्ये एकूण 2,736 भाडेकरू आणि रहिवासी आहेत. त्यामध्ये 2,256 निवासी तर 480 व्यावसायिक गाळेधारकांचा समावेश आहे.
स्थलांतरास विलंब झाल्यास कठोर कारवाई करण्यात येईल- (Dangerous Buildings List in Mumbai)
MHADAने आतापर्यंत केलेल्या कारवाईनुसार,176 रहिवाशांना इमारती रिकाम्या करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. 29 रहिवाशांचे MHADAच्या ट्रान्झिट कॅम्पमध्ये स्थलांतर करण्यात आले आहे. 36 रहिवाशांनी स्वतःहून अन्यत्र स्थलांतर केले आहे. मात्र, अद्याप 2,100 हून अधिक रहिवाशांचे पुनर्वसन करणे बाकी असून त्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात येत आहे. पावसाळ्यात इमारती कोसळण्याच्या घटना टाळण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन MHADAने केले असून, स्थलांतरास विलंब झाल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही अधिकाऱ्यांनी दिला आहे.
MHADA ने अतिधोकादायक घोषित केलेल्या 82 इमारतींची यादी- (Dangerous Buildings List in Mumbai)
१) ३० C–३० D, बोमनजी लेन२) १२०, बोरा बाजार स्ट्रीट३) १५, टंडेल क्रॉस लेन४) १००–१०२, कांबेकर स्ट्रीट५) ७१–७७, सॅम्युअल स्ट्रीट६) इमारत क्र. २३–२७, बनियन स्ट्रीट७) इमारत क्र. ४०, बापू कोर्ट स्ट्रीट८) इमारत क्र. ४०४–४१६ क्लस्टर, शेख मेमन स्ट्रीट व लगतचा परिसर९) इमारत क्र. ४०४-D, कलबादेवी रोड१०) इमारत क्र. १५७/३, कॅव्हल क्रॉस लेन क्र. ५११) इमारत क्र. ८३–८५, ट्रिनिटी स्ट्रीट१२) इमारत क्र. ३७७-A, जे. एस. एस. रोड१३) इमारत क्र. ७–९, रोपा लेन१४) इमारत क्र. २५, नवरोजी स्ट्रीट१५) इमारत क्र. २२–३४, व्ही. पी. रोड१६) इमारत क्र. ५१, फर्स्ट कारपेंटर स्ट्रीट१७) ३१A, मामा परमानंद मार्ग, गिरगाव१८) १६–२२A, खट्टर अली लेन, गिरगाव१९) ११–१३, एम. के. रोड, गिरगाव२०) ५D, दुभाष लेन, गिरगाव२१) ३१६-AB, व्ही. पी. रोड, गिरगाव२२) २४७-B, व्ही. पी. रोड, गिरगाव२३) कल्याण बिल्डिंग, गिरगाव२४) ८८D–८८G, खाडिलकर रोड, गिरगाव२५) ४१–४५, जे. एस. एस. रोड, गिरगाव२६) मंचाराम निवास, शेणवी वाडी२७) विष्णू निवास, शेणवी वाडी२८) २१–BC, खाडिलकर रोड२९) इमारत क्र. ३१४-B, व्ही. पी. रोड३०) इमारत क्र. ५-J, दुभाष लेन३१) ६६–६८A, तात्या घरपुरे पथ३२) मातृवंदना, खेतवाडी ६ वी गल्ली३३) २–८, पावईवाला स्ट्रीट३४) १, खेतवाडी १२ वी गल्ली३५) ४२७-E, एम. एस. अली रोड३६) ३४६–३४८A, बेलासिस रोड३७) ३, राघवजी रोड३८) २५, ससेक्स रोड, माझगाव३९) ८६B, मापलावी मोतीशा लेन४०) ७–९A, हत्तीबाग रोड४१) १०, हत्तीबाग रोड४२) २२, नारळवाडी रोड४३) उनवाला बिल्डिंग, डी. एन. सिंह रोड४४) २६, ससेक्स रोड४५) ७६, टँक बंदर रोड४६) दिग्विजय मिल चाळ, काळाचौकी४७) २–१८, बाबुला टँक रोड४८) जगुली बिल्डिंग, सांकळी स्ट्रीट४९) गुजरिया बिल्डिंग, मौलाना आझाद रोड५०) ४४०–४४२, सर जे. जे. रोड५१) ८५–९७, सोफिया झुबेर रोड क्लस्टर५२) ६७–८१, सोफिया झुबेर रोड५३) मौलाना आझाद रोडवरील विविध संरचना५४) ५०–६४, मौलाना आझाद रोड५५) ४–६–८, मौलाना आझाद रोड५६) डिमटिमकर रोड क्लस्टर५७) १०, मौलाना आझाद रोड५८) १२–२०, मौलाना आझाद रोड५९) कामाठीपुरा १० वी गल्ली६०) कामाठीपुरा ११ वी गल्ली६१) नूर मंझिल, फॉकलंड रोड६२) लक्ष्मी बिल्डिंग, क्लेअर रोड६३) रिटेबल स्ट्रीट बिल्डिंग क्लस्टर६४) न्यू स्टार मॅन्शन, के. के. रोड६५) कोळी चाळ क्र. ३, गणपतराव कदम मार्ग६६) लक्ष्मी बिल्डिंग, एल्फिन्स्टन रोड६७) मेहर लॉज, सात रस्ता६८) साई प्रसाद, मुरारी घाग मार्ग६९) फिटवाला बिल्डिंग, एल्फिन्स्टन रोड७०) हाजी कासम चाळ, शहीद अमर शेख मार्ग७१) खरास बिल्डिंग, एन. एम. जोशी मार्ग७२) विरा बिल्डिंग, जगन्नाथ भातणकर रोड७३) दया विरा बिल्डिंग, जगन्नाथ भातणकर रोड७४) कॉर्नर चेंबर्स, शिवाजी पार्क रोड, दादर७५) गोरेगावकर वाडी, दादर पश्चिम७६) हेडवकर वाडी क्र. २, दादर पश्चिम७७) कुबल निवास, गोखले रोड७८) इलम महल, एस. के. बोले रोड७९) जमाल हाऊस, माहीम८०) आनंद भवन (जुनी इमारत), शिवाजी पार्क८१) मिनर्वा बिल्डिंग, दादर पूर्व८२) मिनर्वा मॅन्शन, डॉ. बी. ए. रोड.
