मुंबई : मुंबई लोकलच्या ठाणे आणि मुलुंडदरम्यान लवकरच नवं रेल्वे स्टेशन उभारण्यात येणार आहे. मध्य रेल्वेने या संबंधिचा प्रस्ताव ठेवला असून
रेल्वे मंडळाच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे.
ठाणे स्टेशनवरील गर्दी कमी करण्यासाठी मध्ये रेल्वेने हा प्रस्ताव ठेवला आहे. ठाणे हे उपनगरीय मार्गावरील सर्वात गर्दीचं स्टेशन आहे.
मुलुंड आणि ठाणे दरम्यान अतिरिक्त स्टेशन सुरु करावं, अशी मागणी प्रवासी मागील दिवसांपासून करत होते. त्यामुळे अंतिम प्रस्तावाला औपचारिक मंजुरी मिळण्याच्या प्रतीक्षेत मध्य रेल्वे आहे.
उपनगरीय रेल्वेच्या निकषानुसार दोन्ही स्टेशनमधील अंतर एक किलोमीटरपेक्षा जास्त असावं. ठाणे आणि मुलुंड स्टेशनमधील अंतर 2.34 किमी आहे.
प्रस्तावानुसार, कोपरीमध्ये ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलजवळ हे स्टेशन उभारण्यात येणार आहे. मात्र या स्टेशनचं नाव अद्याप निश्चित झालेलं नाही, असं मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.
"आम्ही नवीन स्टेशनच्या उभारण्यासंदर्भात रेल्वे मंडळाच्या अंतिम मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवण्याच्या तयारी आहोत," असं मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे व्यवस्थापक रविंदर गोयल सांगितलं.
"नुकतंच रेल्वेचे अभियंत्यांनी ठाण्यातील या प्रकल्पाचा तपासणी केली आणि त्याचं डिझाईन आणि ठिकाण निश्चित केलं," असंही त्यांनी सांगितलं.