मुंबई : मॉझेक पोट्रेट कलाकार चेतन राऊत यांनी तब्बल 31 हजार पुशपिन्सचा वापर करुन 6 बाय 4 फूट लांबीचे देवीचे अनोखे रूप साकारले आहे. आठ जणांच्या टीने 36 सलग काम करुन हे पोट्रेट साकारले आहे. त्यांचे पोट्रेट पाहण्यासाठी लोक गर्दी करत असून सोशल मीडियावर देखील हे व्हायरल होत आहे.


शारदीय नवरात्रोत्सव महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात आणि भक्तीपुर्ण वातावरणात साजरा केला जातो. पण सध्याच्या परिस्थितीत कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा नवरात्रोत्सव तितक्याशा प्रमाणात साजरा करता येणार नसल्याची खंत प्रत्येकाच्याच मनामनात आहे. अश्याच परिस्थितीत मॉझेक पोट्रेट कलाकार चेतन राऊत यांनी तब्बल 31000 पुशपिन्सचा वापर करुन 6 x 4 फूट लांबीचे देवीचे अनोखे रूप साकारले आहे.




खडकाळ माळरानावर मोगरा फुलवणारी नवदुर्गा! आदिवासी दुर्गम भागात राहुनही साधली प्रगती


यात त्यांनी लाल, पिवळा, निळा, हिरवा, सफेद आणि काळा अश्या सहा रंगछटांचा वापर केला असुन हे साकारताना त्यांच्यासोबत त्यांची आठ जणांची टीम होती. सुरेखा राऊत, तन्वी गडदे, श्रद्धा गावडे, योगिता कांबळे, रुची सावंत, चैताली मेस्त्री, कुणाल घाडगे आणि अक्षय रणपिसे ह्यांनी ही सुंदर कलाकृती साकारली आहे. हे पोट्रेट करण्यासाठी त्यांना 36 तासांचा कालावधी लागला. ही कलाकृती मुंबईतील भाईखळा येथील सुप्रसिद्ध दगडी चाळीतील आई माऊलीची असुन भाविकांना नऊ दिवस ही कलाकृती तिथे पाहता येणार आहे.


नवरात्रीत गरबा आणि दांडिया खेळण्यास बंदी, गृह विभागाच्या गाईडलाईन्स जारी!




  • नवरात्रोत्सवासाठी राज्य सरकारची नियमावली

  • नवरात्रोत्सव साध्या पध्दतीने साजरा करणे अपेक्षित

  • सार्वजनिक नवरात्रोत्सवासाठी मंडळांना महापालिका/स्थानिक प्रशासनाची पूर्वपरवनगी घेणे आवश्यक

  • नवरात्रोत्सवासाठी मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत.

  • देवीच्या मूर्तीची उंची सार्वजनिक मंडळांकरिता 4 फूट , घरगुती देवीच्या मूर्तीची उंची 2 फूटांच्या मर्यादित ठेवावी

  • गरबा, दांडिया इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करु नयेत. त्याऐवजी आरोग्य विषयक उपक्रम आयोजित करावेत

  • आरती, भजन, किर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी

  • देवीच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत.

  • रावण दहनाचा कार्यक्रम हा सर्व नियम पाळून प्रतिकात्मक स्वरुपाचा असावा.

  • रावण दहनाकरिता किमान व्यक्तीचं कार्यक्रमस्थळी हजर राहतील याची काळजी घ्यावी

  • देवीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी.

  • देवीच्या मंडपांमध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रीनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी.

  • मंडपात एकावेळी पाचपेक्षा जास्त कार्यकत्यांची उपस्थिती नसावी. तसेच मंडपामध्ये खाद्यपदार्थ अथवा पेयपानाची व्यवस्था करण्यास मनाई असेल.


Shardiya Navratri 2020 | मोझेक पोट्रेटद्वारे साकारलं दगडी चाळच्या देवीचं अनोखं रुप