Mumbai Mono Rail : मोनो रेल अडकली, तांत्रिक अडचण ठीक, बचावकार्यासाठी दोन तास लागणं प्रवाशांच्या जीवाशी खेळ : अंबादास दानवे
Mumbai Mono Rail : मुंबई मोनो रेल तांत्रिक बिघाडामुळं आणि क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी रेल्वेत बसल्यानं बंद पडली. दोन तासानंतर प्रवाशांची सुटका करण्यात यश आलं.

मुंबई : मुंबईतील मोने रेल तांत्रिक बिघाडामुळं भक्ती पार्क आणि म्हैसूर कॉलनी दरम्यान मध्येच अडकली होती. मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या वतीनं बचाव कार्य सुरु करण्यात आलं. साधारणपणे पावणे दोन तासानंतर प्रवाशांची सुटका करण्यात यश आलं. तांत्रिक अडचण आहे हे समजू शकतो पण बचाव कार्यासाठी एक ते दोन तास कसे लागतात, असा सवाल अंबादास दानवे यांनी केला. हा प्रवाशांच्या जीवाशी खेळ आहे, असं दानवे म्हणाले.
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुंबईतील मोनो रेल अडकून पडल्याच्या घटनेसंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. मोनो रेलमध्येच थांबल्याची माहिती असून बचाव कार्य सुरु झाल्याची माहिती आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून पूर्णपणे राज्यात प्रशासन आहे की नाही, सरकार आहे की नाही अशी स्थिती दिसतेय, हवामानाचा अंदाज आहे, लोक वाहून जात आहेत, लोक ट्रॅकवरुन चालत जात आहेत, मोनो रेल बंद पडलेय, एसी बंद आहेत. प्रवासी अडकले आहेत, त्यांच्या जीवाचं बरं वाईट झालं तर जबाबदार कोण आहे, असा सवाल अंबादास दानवे यांनी केला आहे.
बचावकार्य होतंय हे ठीक आहे, पण हा प्रवाशांच्या जीवाशी खेळ आहे. तांत्रिक अडचण आहे हे समजू शकतो पण एक तास, दोन तास लागतो, असा सवाल अंबादास दानवेंनी केला. तांत्रिक अडचण येऊ शकते पण त्यानंतर पाच मिनिटं, दहा मिनिटं, मुंबई सारख्या शहरात दोन तास कसे लागतात असा सवाल अंबादास दानवे यांनी केला आहे. पूर्ण माहिती नाही, मार्गदर्शन नाही, असं अंबादास दानवे म्हणाले.
हर्षवर्धन सपकाळ काय म्हणाले?
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती ठप्प असल्याचं पाहायला मिळतं. नैसर्गिक आपत्तीला हे सरकार तयार नसल्याचं दिसून येतं. मोनो रेलची घटना घडलीय त्यासाठी सरकार तयार नाही, तत्परता हा भाग दिसत नाही. प्रवाशांची लवकरात लवकर सुटका व्हावी, यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे, असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
प्रवाशांचं बचाव कार्य सुरुच
मोनो रेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यास सुरुवात होऊन एक तास उलटून गेला तरी बचाव कार्य सुरुच आहे. काही प्रवाशांना अजूनही क्रेनच्या माध्यमातून मोनो रेलमधून बाहेर काढलं जात आहे. दोन ते तीन क्रेनच्या सहाय्यानं बचाव कार्य सुरु करण्यात आलं आहे.
मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी मोनो रेल एका बाजूला कललेली होती. त्यामुळं मोनो रेलमधून बचाव कार्य करण्यासाठी अगोदर वीज पुरवठा बंद करण्यात आल्याची माहिती भूषण गगराणी यांनी दिली. तीन क्रेनच्या सहाय्यानं बचाव कार्य सुरु ठेवण्यात आलं आहे.
























