Mumbai Metro मुंबई: 'दहिसर-अंधेरी पश्चिम मेट्रो 2 अ' आणि 'दहिसर-गुंदवली मेट्रो 7' मार्गिकेवरील वेळापत्रकात आजपासून आठवडाभरासाठी बदल करण्यात आला आहे. या मार्गिकेवरील सेवा आजपासून (12 ऑक्टोबर) 18 ऑक्टोबरपर्यंत सकाळच्या वेळी काही मिनिटे उशिरा सुरू होणार आहे, अशी माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दिलीय. एमएमआरडीएने सध्या 'दहिसर-मिरा-भाईंदर मेट्रो 9' मार्गिकेतील दहिसर-काशीगाव टप्प्याच्या एकत्रिकरणासह सुरक्षा चाचण्यांचं काम हाती घेतलं आहे. या कामासाठी एमएमआरडीएने 'मेट्रो 2 अ' आणि 'मेट्रो 7' मार्गिकांची सेवा सकाळी काही मिनिटांनी उशिरा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय.

Continues below advertisement

12 ते 18 ऑक्टोबरदरम्यान सकाळी मेट्रो उशिरा धावणार- (Metro will run late in the morning from October 12 to 18)

मेट्रो मार्गिका 7 (गुंदवली –ओवरीपाडा) ला मेट्रो मार्गिका 9 (पहिला टप्पा – दहिसर पूर्व ते काशीगाव) शी जोडण्याच्या कामासाठी आवश्यक प्रणाली एकत्रीकरण (System Integration) आणि सुरक्षा चाचण्या (Safety Trials) हाती घेण्यात येत आहेत. या कारणास्तव 12 ते 18 ऑक्टोबर 2025 या कालावधीत मेट्रो मार्गिका 2ए (दहिसर पूर्व–डी.एन. नगर) व मेट्रो मार्गिका 7 या दोन्ही मार्गांवरील सकाळच्या मेट्रो सेवा नेहमीपेक्षा थोड्या उशिरा सुरू होतील.

'मेट्रो 2 अ', 'मेट्रो 7'च्या वेळापत्रकात बदल- (Changes in the timetable of 'Metro 2A', 'Metro 7')

डहाणूकरवाडी (Dahanukarwadi) ते गुंदवली पहिली मेट्रो

Continues below advertisement

सोमवार ते शुक्रवार सकाळी 07:01

शनिवार 07:00

रविवार 07:04 वाजता

डहाणूकरवाडी (Dahanukarwadi) ते अंधेरी पश्चिम

सोमवार ते शुक्रवार सकाळी 07:06

शनिवार 06:58

रविवार 06:59

दहिसर पूर्व (Dahisar East) ते अंधेरी पश्चिम

सोमवार ते शुक्रवार सकाळी 06:58

शनिवार आणि रविवार 07.02

दहिसर पूर्व (Dahisar East) ते गुंदवली

सोमवार ते शुक्रवार – सकाळी 06.58

शनिवार 07:06

रविवार 07:01

अंधेरी पश्चिम (Andheri West) ते गुंदवली

सोमवार ते शुक्रवार सकाळी 07:01

शनिवार 07:02

रविवार 07:04

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO: