निवासी डॉक्टर आणि महापौरांची आज बैठक झाली. या बैठकीत डॉक्टरांच्या काही मागण्या मान्य झाल्या, मात्र तरीही ही बैठक निष्फळ ठरली. बैठकीत कोणताही तोडगा निघाला नसल्यामुळं डॉक्टरांनी सामूहिक रजा मागे न घेण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान महापौरांसोबतच्या बैठकीत निवासी डॉक्टरांच्या काही मागण्यांना तात्काळ मंजुरी देण्यात आली. तरीही डॉक्टरांनी सामूहिक रजेचा पवित्रा कायम ठेवल्यामुळं रुग्णाचे प्रचंड हाल होत आहेत.
डॉक्टरांचा मागण्या मान्य
- महापौरांसोबतच्या बैठकीत डॉक्टरांच्या काही मागण्या तातडीने मान्य करण्यात आल्या.
- केवळ २ नातेवाईकांना पेशंटसोबत प्रवेश दिला जावा.
- हॉस्पिटलमध्ये अलार्म सिस्टीम लावण्यात यावी (ही मागणी बैठकीतच तात्काळ मंजूर करण्यात आली)
- यासोबत हॉस्पिटलमध्ये पास सिस्टीमही लागू करण्यात येणार आहे.
- मुंबई महापालिका प्रशासन डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षकांची संख्या वाढवणार
- सध्या ४३२ सुरक्षारक्षक सर्व महापालिका हॉस्पिटलमध्ये मिळून आहेत.
- यात वाढ करुन शनिवारी ४०० पोलिसांची नेमणूक करणार, तर, नंतर ही संख्या ७०० पर्यंत वाढवणार.
मार्डच्या डॉक्टरांच्या नेमक्या मागण्या काय?
- डॉक्टरांवरील हल्ले टळण्यासाठी डॉक्टर्स प्रोटेक्शन अॅक्ट २०१० ची परिणामकारक अंमलबजावणी करा
- डॉक्टरांना मारहाण करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी
- निवासी डॉक्टरांना सुरक्षीत वातावरणात काम करता यावे यासाठी सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवा
- सुरक्षेसाठी सीसीटीव्ही लावा.
सायन रुग्णालयात डॉक्टरला मारहाण
मुंबईच्या सायन रुग्णालयात शनिवारी रेखा सिंह यांच्या मृत्यूनंतर, त्यांच्या नातेवाईकांनी डॉक्टर रोहित कुमार यांना मारहाण केली. या मारहाणीच्या निषेधार्थ राज्यभरातील सर्व निवासी डॉक्टर सामूहिक रजेवर गेलेत.
या मारहाणीप्रकरणी सायन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
या घटनेचा निषेध म्हणून रविवार संध्याकाळपासून सायनसह नायर आणि केईएम रुग्णालयातील रुग्णसेवा बंद आहे. या रुग्णालयात सध्या केवळ अत्यावश्यक सेवा सुरु आहे.
आज सकाळपासून राज्यभरातल्या सर्व निवासी डॉक्टरांनी बंद पुकारल्यानं रुग्णसेवा ठप्प पडली आहे.
संबंधित बातम्या
राज्यभरातील डॉक्टर रजेवर, रुग्णांचे हाल
सायन रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांची निवासी डॉक्टरला मारहाण
औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात डॉक्टरला मारहाण
धुळ्याच्या मारहाणीविरोधातला निवासी डॉक्टरांचा संप मागे
इंजिनिअरच व्हायला हवं होतं, धुळ्याच्या ‘त्या’ डॉक्टरची हतबलता
धुळे डॉक्टर मारहाण : संशयित आरोपीचा पोलिस कोठडीत गळफास
धुळ्यात जबर मारहाणीत डॉक्टरचा डोळा निकामी होण्याची भीती