Mumbai Mayor Kishori Pednekar : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी पत्राद्वारे देण्यात आली होती. याबाबत किशोरी पेडणेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी किशोरी पेडणेकर यांच्या डोळ्यातून अश्रू आले. बोलताना त्या म्हणाल्या की, पत्रात हीन दर्जेच्या भाषेचा वापर करण्यात आलाय. कुटंबाला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. माझ्या कुटुंबाला काही झालं तर सहन करणार नाही. पत्रात अवयवाची विंटबना कऱण्याची धमकी देण्यात आली आहे. आज सकाळी मला धमकीचे पत्र मिळाले. गेले ४० वर्ष आम्ही आमचं चारित्र्य जपलं. पत्रातील भाषा अत्यंत अश्लिल आहे. मी ते पत्र वाचुही शकले नाही. स्त्रियांच्या ज्या भागाचा उल्लेख करु नये अश्या भागांचा उल्लेख या केला जातोय. मारुन टाकू, विटंबना करु असे पत्रात म्हटलेय.
किशोरी पेडणेकर पत्रांरांशी बोलताना संतापल्या आणि रागाने डोळे पाणावले. ते म्हणाल्या की, मी वयाची साठी ओलांडल्यानंतर मला असे पत्र आलेय. माझ्या नव-याला मारुन टाकू, मुलाला मारु, माझ्या अवयवांची विटंबना करु असे लिहीलेय. राजकिय आरोपांची पातळी खाली चाललीय. याआधी आरोप पक्षांवर होत होते. आता महापौर महिला आहे हे माहित असूनही जे शब्द वापरले जातात ते क्लेषदायक आहे. विजेंद्र म्हात्रे या व्यक्तीनं पत्र लिहीलंय. या पत्रावर उरणचा पत्ता आहे. पोस्ट पनवेलचे आहे. मी अश्या गोष्टींना भीक घालत नाही. पण कुठेतरी हे पत्र लिहीणारी व्यक्ती जोडली गेलेली आहे. या पत्राची तक्रार घेऊन आम्ही महिला आयोगाकडे जाणार आहोत.
पेडणेकरांना पत्र -
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी पत्राद्वारे दिली आहे. या पत्रात महापौरांच्या कुटुंबियांनाही गोळ्या घालून मारण्याची धमकी देण्यात आली आहे. माझ्या दादाकडे बघशील तर परिणाम वाईट होतील असे सांगून अश्लिल भाषेत धमकी देणारे हे पत्र महापौर निवासस्थानाच्या पत्त्यावर आले आहे. गेल्यावर्षीही महापौरांना फोनद्वारे आली होती जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. महापौर झाल्यापासून किशोरी पेडणेकरांना दुसऱ्यांदा धमकी देण्यात आली आहे. आशिष शेलार आणि किशोरी पेडणेकर यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर धमकीचं पत्र मिळाल्यानं खळबळ उडाली आहे. पत्रात अश्लिल भाषेचा वापर करण्यात आला आहे.
माझ्या दादाकडे वाकड्या नजरेनं पाहू नका
काल संध्याकाळी महापौर बंगल्यावर पत्र दाखल झालेलं आहे. या पत्रात सरळ सरळ धमकी देण्यात आली आहे. महापौर आणि सगळ्या कुटुंबाला संपवण्याची धमकी देण्यात आली आहे. माझ्या दादाकडे वाकड्या नजरेनं बघू नका, असा इशारा पत्रात देण्यात आला आहे. हे पत्र पनवेलमधून कुरिअरद्वारे आलेलं आहे. किशोरी पेडणेकर यांना दुसऱ्यांदा ही धमकी देण्यात आली आहे. यापूर्वी फोन कॉलवरुन त्यांना धमकी देण्यात आली होती. महापौर किशोरी पेडणेकर स्वत: पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करणार आहेत. पत्रात नाव वेगवेगळी असल्यानं हे पत्र कुणी पाठवलं आहे याचा तपास होण्याची शक्यता आहे.