मुंबई : ठाकरेंचे नगरसेवक शिंदेंकडे येणार असतील तर अभिनंदन आहे, असे मत मुंबई महापालिकेतील भाजपचे गटनेते गणेश खणकर यांनी व्यक्त केले. महापौर पदाची स्वप्न कोणीही पाहू शकत असेही ते म्हणाले. काही दिवसात आमचाही आकडा वाढेल असा सूचक इशारा देखील गणेश खणकर यांनी दिला. ऑपरेशन लोटस नेहमी सुरु असतं, पालिकेत देखील ऑपरेशन लोटस राबवले जाणार असल्याची माहिती खणकर यांनी दिली.  

Continues below advertisement

ऑपरेशन टायगर हे लोटस शिवाय शक्य नाही

ऑपरेशन टायगर हे लोटस शिवाय शक्य नाही असेही  मुंबई महापालिकेतील भाजपच गटनेते गणेश खणकर म्हणाले. अनेक नगरसेवकांचा आकडा येत्या काळात वाढणार असल्याचेही  गणेश खणकर म्हणाले. महापौर पदाची स्वप्न कोणीही पाहू शकत. काही दिवसात मुंबई महापालिकेतील आमचाही आकडा वाढू शकतो असा सूचक इशारा देखील खणकर यांनी दिला आहे. 

एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचं स्पष्ट

चार वर्षानंतर ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे. गुरुवारी दिल्लीत झालेल्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या संसदीय दलाच्या बैठकीला पक्षाचा व्हीप धुडकावून 6 खासदार अनुपस्थित राहिले. हे तेच 6 खासदार आहेत जे बंडखोरी करून शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा होती. या बैठकीला फक्त संजय राऊत, अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे हे चारच खासदार हजर होते. गैरहजर खासदारांना पक्षाने नोटीस पाठवली असून 7 दिवसांत उत्तर न दिल्यास कारवाईचा इशारा दिला आहे. त्यामुळे ठाकरेंचे सहा खासदार शिंदेंच्या शिवसेनेत जाणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. यावर दानवेंनी प्रतिक्रिया दिली आहे. ऑपरेशन टायगर यशस्वी झालं असं म्हणता येणार नाही असे दानवे म्हणाले. 

Continues below advertisement

खासदारांच्या विलिनीकरणाची घोषणा संसदेकडून शनिवारी केली जाणार

शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरबद्दलची (Operation Tiger) आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. ज्या सहा खासदारांनी ठाकरेंना सोडून स्वतंत्र गट निर्माण केला आहे. तसेच त्यांच्या विलिनीकरणाची घोषणा संसदेकडून शनिवारी केली जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे ऑपरेशन टायगर यसस्वी झालं असलं तरी त्याची घोषणा ही शिवसेनेच्या वर्धापणदिनानंतरच केली जाणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. 

Shivsena Operation Tiger MP List : कोणते खासदार फुटल्याचा दावा?

1. संजय जाधव (परभणी)

2. संजय देशमुख (यवतमाळवाशिम)

3. नागेश पाटील आष्टीकर (हिंगोली)

4. ओमराजे निंबाळकर (धाराशिव)

5. भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी)

6. संजय दीना पाटील (ईशान्य मुंबई)