Mumbai Local Train Diva Crowd: मध्य रेल्वेमार्गावरील डोंबिवली स्थानकात सोमवारी लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन घसरुन अपघात झाला होता. त्यामुळे काल सकाळी ऐन गर्दीच्यावेळी मध्य रेल्वेची (Central Railway) वाहतूक विस्काळीत होऊन प्रवाशांचे हाल झाले होते. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशीही मध्य रेल्वेच्या प्रवाशांना या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. आज सकाळी दिवा रेल्वे स्थानकात (Diva Railway station) प्रवाशांची तुफान गर्दी पाहायला मिळाली. दिवा रेल्वे स्थानकातील हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये दिवा स्थानकातील रेल्वे  प्लॅटफॉर्मच्या दोन्ही बाजूंना प्रवाशांची प्रचंड गर्दी (Crowd) झालेली पाहायला मिळत आहे. यामध्ये महिला प्रवाशांची संख्या मोठी आहे. दोन्ही प्लॅटफॉर्मच्या अगदी टोकापर्यंत खच्चून गर्दी दिसत आहे. (Mumbai Railway trains delayed)

Continues below advertisement

या सगळ्याचे कारणही आता समोर आले आहे. आज सकाळपासून सीएसएमटीच्या दिशेने येणाऱ्या अप मार्गावरील लोकल ट्रेन 20 ते 25 मिनिटांच्या उशिराने धावत आहेत. काल डोंबिवली (Dombivli Railway station) इथे लोकलचा डबा रुळावरून घसरल्याने सकाळी लोकल उशिराने होत्या. सोमवारी रात्री खर्डी स्टेशन जवळ एक आवश्यक ब्लॉक घेण्यात आला होता, तो ब्लॉक पहाटे तीन वाजता संपून रेल्वेची वाहतूक पूर्ववत होणे अपेक्षित होते. मात्र, हा ब्लॉक सकाळी सहा वाजेपर्यंत सुरु होता. त्यामुळे लोकल आणि एक्सप्रेस बंद राहिल्या. परिणामी आजदेखील मध्य रेल्वेची वाहतूक प्रचंड उशिराने धावत असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Continues below advertisement

Local Train Accident Dombivli: डोंबिवलीत लोकल ट्रेनचा फर्स्टक्लासचा डबा रुळावरुन खाली घसरला

मध्य रेल्वेच्या डोंबिवली (Dombivli Railway station) स्थानकानजीक लोकल ट्रेनचा डबा सोमवारी सकाळी रुळावरुन घसरल्याची घटना घडली. ही लोकल ट्रेन (Local Train) कळवा कारशेडमधून कल्याणच्या दिशेने जात होती. त्यावेळी डोंबिवली स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवरुन निघत असताना या ट्रेनचा प्रथम श्रेणीचा डबा रुळावरुन खाली घसरला. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. त्यानंतर मध्य रेल्वेने रेल्वेचा हा डबा पुन्हा ट्रॅकवर आणण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम हाती घेतली होती. अखेर दोन-अडीच तासांच्या मेहनतीनंतर रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना हा डबा पुन्हा रुळांवर आणण्यात यश आले. त्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली होती. मात्र, दरम्यानच्या काळात मध्य रेल्वेच्या गाड्यांचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले होते. लोकल ट्रेनला प्रचंड गर्दी असल्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला होता.

आणखी वाचा

डोंबिवलीत लोकल ट्रेनचा फर्स्ट क्लासचा डबा रुळावरुन घसरला, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, ट्रेन 15 ते 20 मिनिटं उशिराने