Mumbai Local Train Rain: राज्यभरातपाऊसप्रचंडधुमाकूळघालतअसतानामुंबईतील लोकलरेल्वे (Mumbai Local Train) प्रवासासंदर्भातएकमहत्वाचीमाहितीसमोरआलीआहे. कांजूर-विक्रोळीदरम्यान (Kanjur -Vikhroli Local Trains) तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल ट्रेन( Local Train) एकाच जागी थांबल्या आहेत. मिळालेल्यामाहितीनुसार, मध्ये रेल्वेच्या विक्रोळी-कांजूरमध्ये ओव्हरहेड इक्विपमेंट (OHE) वर प्लास्टिक अडकल्यामुळे रेल्वे वाहतुकीवर तात्पुरता परिणाम झालाआहे. दरम्यान, संबंधित विभागाकडूनसध्या प्लास्टिक काढण्याचे काम सुरू आहे. मात्रया कारणामुळे विक्रोळी आणि कांजूरमार्ग स्थानकांदरम्यान दोन गाड्या थांबवण्यात आल्या आहेत. (Mumbai Pune Rain Updates Marathi News)
एकीकडे, मुंबईत मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. या पावसाचा फटका रेल्वे, रस्ते वाहतुकीवर झाला आहे. तर अनेक महामार्गावर दरड कोसळण्याच्या आणि पुलावर पाणी आल्याने रस्ते वाहतूक ठप्प करण्यात आली आहे.अशातच नव्यानं खुला करण्यात आलेल्या मिसिंग लिंकवर दरड कोसळलेली आहे. तर दुसरीकडे पुणे-मुंबई लोहमार्गावर ठाकूरवाडी परिसरात दरड कोसळलेली आहे. यामुळं हा पर्याय ही चाकरमान्यांसाठी बंद आहे. एकंदरीत महामार्ग आणि लोहमार्ग हे दोन्ही मार्ग आज वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्यानेनागरिकांचीएकचतारांबळउडालीआहे. (Mumbai Pune Rain Updates Marathi News)
मुंबईत पुढील 48 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज; आजही रेड अलर्ट कायम
दरम्यान, मुंबईत पुढील 48 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यातआलाआहे. तर पुढील दोन दिवसांत विदर्भात देखील पावसाचाजोरवाढणारआहे. मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्याने मुंबईच्या काही भागात आजही रेड अलर्ट कायमआहे. तरतिकडेविदर्भात पुढील दोन दिवसांत काही भागात विश्रांतीनंतर पाऊस येणार असल्याचीमाहितीनागपूर प्रादेशिक हवामान विभागाकडूनदेण्यातआलीआहे. पुढील 48 तासांत गोंदिया, भंडारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यातआलाआहे. तर विदर्भातील अमरावतीच्या भागातही पावसाचाही अंदाज आहे.
रत्नागिरीतील मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे रत्नागिरी रेल्वे स्थानकाच्या छताचा सुमारे ५० ते ६० फूट भाग कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. नुकतेच स्थानकाचे नूतनीकरण आणि सुशोभीकरण करण्यात आले होते. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या कामाचा ठेका खासगी कंपनीला देण्यात आला होता. विशेष म्हणजे, गेल्या वर्षीही या छताला गळती लागल्याच्या तक्रारी होत्या. आता छताचा भाग कोसळल्याने कामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असून, संबंधित यंत्रणेकडून घटनेची चौकशी सुरू आहे.
मुंबई महानगरपालिकेकडून महत्वाच्या सूचना- (Mumbai Rain Marathi News)
- भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई महानगर क्षेत्रासाठी अतिवृष्टीचा इशारा (Red Alert) जारी केला असून ताशी ८० ते ९० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तविली आहे.
- बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे. झाडे, जीर्ण इमारती, होर्डिंग्ज, विद्युत खांब तसेच इतर धोकादायक ठिकाणांपासून सुरक्षित अंतर राखावे. झाडांखाली वाहने उभी (Park) करण्याचे टाळावे. समुद्रकिनारी तसेच पाणथळ भागात जाणे टाळावे.
- नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माध्यमांद्वारे प्रसारित करण्यात येणाऱ्या सूचना व इशाऱ्यांचे पालन करावे. प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या सूचना व मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करावे.
- तसेच, आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदतीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या १९१६ या मदतसेवा क्रमांकावर संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात येत आहे.
- बृहन्मुंबई महानगरपालिकेसह विविध यंत्रणांचे सुमारे १५ हजार अधिकारी व कर्मचारी आपापल्या कार्यक्षेत्रात (ऑन ग्राउंड) अहोरात्र कार्यरत आहेत. वरिष्ठ अधिकारीदेखील प्रत्येक घडामोडीवर सातत्याने बारकाईने लक्ष ठेवून आवश्यक त्या उपाययोजनांचे समन्वयन करीत आहेत.
