Mumbai Local Train : मुंबईची जीवनवाहिनी (Mumbai Lifeline) समजल्याजाणाऱ्यामुंबईलोकलसंदर्भातएकमहत्वाचीबातमीसमोरआलीआहे. मध्य रेल्वेची (Central Railway) वाहतूकसेवा पुन्हा एकदा विस्कळीत झालीआहे. पावर सप्लाय बंद पडल्याने पहाटेची लोकल (Mumbai Local Train) सेवा ठप्प झाल्याचीमाहितीआहे. कसारा-कल्याण मार्गावर पहाटेच्या सुमारास मध्य रेल्वेचा खोळंबा झालाआहे. आसनगाव ते खडवली दरम्यान अप-लाइन मार्गावरील पावर सप्लाय बंद पडल्याने वाहतूक प्रभावित झालीआहे. परिणामी, तब्बल एक ते दीड तास लोकल सेवा विस्कळीत झालीआहे.

Mumbai Local Train : कसारा-कल्याण मार्गावर लोकल ट्रेन बंद पडली, दीड तासांपासून प्रवाशांचा खोळंबा

मिळालेल्यामाहितीनुसार, 4:30 ची पहिली लोकल 4:45 ते 5:25 दरम्यान अडकली असल्याचीमाहिती रेल्वे प्रवासी संघटनेनेदिलीआहे. अशातच पहाटे प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे यामुळेप्रचंड हाल झालेअसून स्टेशनवर मोठी गर्दी झाल्याचंबघायलामिळालंआहे. वारंवार बिघाडामुळे मध्य रेल्वे प्रशासनावर प्रवाशांनी संताप व्यक्तकेलाआहे. आजरविवारसुटीचादिवसअसलातरीचाकरमान्यांचेयामुळेहालझालेआहे.

Mumbai Local Megablock: मार्गावर माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान मेगाब्लॉक 

दरम्यान, आज (रविवारी) मध्य (Central) आणि हार्बर (Harbour) रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक जाहीर करण्यातआलाआहे.  मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर सकाळी 11:05 ते दुपारी 3:55 या वेळेत मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. या कालावधीत धीम्या मार्गावरील लोकल गाड्या जलद मार्गावर वळवण्यात येतील. परिणामी, काही लोकल गाड्या निवडक स्थानकांवर थांबणार नाहीत. तसेच, अनेक गाड्या त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांनी अतिरिक्त वेळ गृहीत धरून प्रवासाचे नियोजन करावे, असेआवाहनरेल्वे प्रशासनाकडूनकरण्यातआलेआहे.

Mumbai Local: हार्बर लाईनवरील रेल्वेगाड्या स्थगित राहतील.

सीएसएमटी ते वाशी/बेलापूर/पनवेलकडे जाणाऱ्या डाउन हार्बर लाईनच्या गाड्या सकाळी ११:१६ ते सायंकाळी ४:४७ पर्यंत आणि वांद्रे/गोरेगावकडे जाणाऱ्या डाउन हार्बर लाईनच्या गाड्या सकाळी १०:४८ ते सायंकाळी ४:४३ पर्यंत स्थगित राहतील. याव्यतिरिक्त, पनवेल/बेलापूर/वाशी ते सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप हार्बर लाईनच्या गाड्या सकाळी ९:५३ ते सायंकाळी ३:२० पर्यंत आणि गोरेगाव/वांद्रे ते सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप हार्बर लाईनच्या गाड्या सकाळी १०:४५ ते सायंकाळी ५:१३ पर्यंत स्थगित राहतील. ब्लॉक कालावधीत, पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक ८) दरम्यान दर २० मिनिटांच्या अंतराने विशेष गाड्या धावतील. ब्लॉक कालावधीत, हार्बर लाईनचे प्रवासी सकाळी १०:०० ते सायंकाळी ६:०० पर्यंत मेन लाईन आणि पश्चिम रेल्वेमार्गे प्रवास करू शकतील.